महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : विरोधकांचा भोंगा वाजतच राहणार

Union Budget 2024 : महाराष्ट्राचा चौफेर विकास साध्य

Modi Government 3.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला तिसरी महासत्ता बनविण्यासाठी जोमाने काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी जाहीरनामा दिला होता. त्या जाहीरनाम्याप्रमाणे देशाला उच्चस्तरावर नेण्यासाठी मंगळवारी (ता. 23) अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राला मजबुती मिळणार, असे भाजप नेते तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

देशातील बहिणींना, शेतकरी, शेतमजुरांना, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांना, प्रधानमंत्री सूर्य घर योजनेला पुरेपूर राबविण्यासाठी हा उत्कृष्ट अर्थसंकल्प आहे. ग्रामीणपासून ते मेट्रोपर्यंत सर्वांना न्याय मिळाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र या अर्थसंकल्पाद्वारे येणाऱ्या काळात विकसित होणार आहे. केंद्र सरकार आणि राज्यातील डबल इंजिन सरकार महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी प्रचंड ताकदीने काम करीत आहे, असे बावनकुळे म्हणाले.

विरोधकांना काम नाही

विरोधकांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विरोधक नेहमीच टीका करत असतात. विरोधकांचा भोंगा नेहमी वाजतच राहणार. तो शांत होणार नाही. परंतु विरोधकांच्या भोंग्याकडे लक्ष देऊन काहीही फायदा नाही. आज जे लोक अर्थसंकल्पावर टीका करत आहेत, त्यांनी कधीच गरीब, मध्यमवर्गीय जनतेचा विचार केलाच नाही. जनतेला ‘इन्कमटॅक्स’मधून सूट द्यावी, असा विचार विरोधकांनी कधीच केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बल परिवारांना इन्कमटॅक्समधून मोठी सूट दिली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्टपणे सांगितले की, महायुतीचे सरकार स्थापन होणार. महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत वाद नाही. भाजपकडे (BJP) जास्त मतदारसंघ असल्याने भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार येणार. त्यामुळे संजय राऊत यांनी आधी स्वतःच्या महाविकास आघाडीकडे बघावे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अनेक मुख्यमंत्री तयार झाले आहेत. काँग्रेस पक्षात 3, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात तीन असे मुख्यमंत्री महाविकास आघाडीत तयार झाले आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही शर्यत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

योजना बंद पाडतील

केंद्र सरकार पुढील पाच वर्षे कायम राहणार आहे. केंद्रातील आणि राज्यात डबल इंजिन सरकार महाराष्ट्राचा विकास करणार आहे. अशात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर, पंतप्रधान आणि राज्यातील मुख्यमंत्री यांच्या संपूर्ण योजना ते बंद पाडतील. ज्याप्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अडीच वर्षे योजना बंद पाडल्या. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी पुन्हा योजना बंद पाडणार. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला मतदान करणार नाही. महायुतीचे सरकार स्थापन होईल. विरोधकांना त्यांचे स्वप्न बघू द्या, आपण विकास करू, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!