महाराष्ट्र

Lok Sabha Election : काँग्रेस म्हणजे कालबाह्य झालेले औषध, केवळ फेकायच्या कामाचे !

Chandrapur Constituency : पदासाठी कधीही हपापलो नव्हतो, पण मोदींनी आग्रह केला.

Sudhir Mungantiwar : काँग्रेसची अवस्था देशात फारच बिकट झाली आहे. अनेक वर्ष राज्य करूनही जनतेची कामे न केल्याने लोकांनी आता काँग्रेसला वाळीत टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था कधीही वापरात न येणाऱ्या कालबाह्य (एक्सपायर) झालेल्या औषधीप्रमाणे झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

Lok sabha Election : एक-एक करत नेते चालले सोडून, चांद्यात महाविकासचा झालाय वांदा !

चंद्रपूर लोकसभा मतदारासंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांना आज (ता. 3) त्यांनी संबोधित केले. ते म्हणाले, काँग्रेस हा फसवा पक्ष आहे. आपण आमदार झालो, नामदारही झालो. पण खासदार व्हायची इच्छा नव्हती. पदासाठी आपण कधीही हपापलेलो नव्हतो. आपल्याला लोकसभेची उमेदवारी नको होती. परंतु पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आग्रह केला. त्यांचे ‘चारशे पार’चे स्वप्न साकार करण्यासाठी आता पूर्ण ताकदीने ही निवडणूक जिंकणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी हे आव्हान मी स्वीकारले आहे. नरेंद्रजी मोदी यांनी देशातील मायबहिणींना सुरक्षा देण्याचे काम केले. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 932 कोटी रुपयांची योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. राज्य सरकारद्वारे आम्ही महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना सुरू करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूरला देशात सर्वांत विकसित मतदारसंघ बनविण्याचे आपले स्वप्न आहे. यासाठी आता आपला विजय होणे आवश्यक आहे. अर्थातच हा विजय मतदारांचा असणार आहे. चंद्रपुरातील जनतेने नेहमी विकासाला प्राधान्य दिले आहे. चंद्रपुरात विकासाची गंगा आणली. आता याच चंद्रपूरला देशात ‘नंबर वन’ बनविण्याचा आपला संकल्प असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!