महाराष्ट्र

Assembly Election : महायुतीचं जागांबाबत झालं एकमत

Chandrashekhar Bawankule : प्रदेशाध्यक्षांनी दिले निर्णय जाहीर करण्याचे संकेत

Mahayuti : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविल्या जात आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या आहेत. या दोन्ही आघाड्यातील जागा वाटपाची चर्चांना वेग आला आहे. अशातच महायुतीच्या घटक पक्षांची बैठक नुकतीच नागपुरात पार पडली. या बैठकीत राज्यातील 288 जागांवर चर्चा करण्यात आली आहे. तीन तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 173 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. 

बैठकीत भाजपला जास्त जागा देण्याचा निर्णयही झाला आहे. भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळतील. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे अद्यापही ठरलेले नाही. पुढे होणाऱ्या बैठकीत उर्वरित जागांवर चर्चा होऊन एकमत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. या निवडणुकीनंतर राज्यात नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झालेत. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी एकत्र लढण्यासाठी महायुतीतील पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत.

दावे-प्रतिदावे

जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशातच महायुतीची दुसरी बैठक 31 ऑगस्ट रोजी नागपुरात पार पडली. या बैठकीत तीनही पक्षात काही जागांवरून एकमत झाल्याची माहिती आहे. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. महायुतीच्या बैठकीत काही जागांवर एकमत झाले आहे. 173 जागांबाबत तीनही पक्षात सहमती झाली आहे. .

जागा वाटपात भाजप प्रथम क्रमांकावर असेल. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर जागा वाटप होणार आहे. हाच प्राधान्य क्रम ठरविण्यात आला आहे. उर्वरित 115 जागांवर यापुढील बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. बावनकुळे म्हणाले, पुढच्या दहा दिवसांत 10 तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल.

जागा वाटपाचा फार्मूला नेते जाहीर करतील. कुठेही आकडेवारी मांडलेली नाही. जो जिंकेल, त्याला ती जागा देण्याचा निर्णय झाला. मित्र पक्षांनाही जागा देण्याबाबत चर्चा झाली. कोणाला किती जागा मिळाव्या, हे महत्त्वाचं नाही. राज्यात आमच्या योजना पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार हवं आहे. निवडणूक जिंकण्याची प्राथमिकता राहणार आहे. कोणाचाही जागेचा आग्रह नाही. 13 मित्रपक्ष आहेत. त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सुनिल तटकर, प्रफुल्ल पटेल आदी बैठकीत होते. विदर्भातील विकास कामांबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याकडे लक्ष देणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!