महाराष्ट्र

Shiv Sena : काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवले, ठाकरेंनी डोक्यावर घेतले

CM Eknath Shinde : म्हणूनच धाडसी निर्णय घ्यावा लागला

Mahayuti News काँग्रेसला बाळासाहेबांनी नेहमीच दूर ठेवले. मात्र, त्यांनाच उद्धव ठाकरेंनी सोबत घेतले, डोक्यावर घेतले. एका खूर्चीपायी शिवसैनिकांचे खच्चीकरण सुरु झाले. आमदार सैरभैर झाले. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत होते. शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसेना प्रमुखांचे विचार कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आपण धाडसी निर्णय घेतला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदना व्यक्त केली. आणि उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.

नाशिक येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, एरिअल फोटोग्राफी करुन राज्य चालवता येत नाही, हे जाणून असल्यानेच बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नाही. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिले. त्यांच्यासमोर मुख्यमंत्रीपद नगण्य होते. मात्र त्यांचे वारस असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मनात अनेक वर्षांपासून मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा होती. ती त्यांनी पूर्ण केली.

 एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लावला टोला

नाशिकमधील विजय करंजकर यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विजय आप्पांचे जसे शेवटच्या दिवसापर्यंत नाव होते, तसेच आपलेही शेवटच्या दिवसापर्यंत नाव होते. मात्र, शिवसैनिकाला दूर सारुन स्वत:च मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. जेव्हा 50 आमदार टोकाची भूमिका घेतात तेव्हा कारण देखील टोकाचे असते.

त्यांना खोक्यांशिवाय झोप लागत नाही. राज ठाकरे म्हणाले होते यांना खोके नाही कंटेनर लागतो. शिवसेना भाजप युतीचा कौल नाकारुन कॉंग्रेसला सोबत केली आणि सरकार स्थापन केले. मग तुम्हाला महागद्दार म्हणायचे का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उबाठाला केला. धर्मवीर सिनेमात ‘गद्दारांना क्षमा नाही’ असा शब्द आहे. जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संपवण्याचा तुम्ही घाट घातला तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हा शब्द तुम्हाला लागू झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उबाठाचा करेक्ट कार्यक्रम केल्याने देशभर या उठावाची दखल घेतली गेली. राजस्थानमधून 4 अपक्ष आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. 25 राज्यातील लोक शिवसेनेसोबत आहे. निवडणुकीत तिकिट विकण्याची कामे त्यांनी केली. त्यामुळे राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक यांच्यासारखी चांगली माणसे शिवसेना सोडून गेली. म्हणून शिवसेना कधीही स्वबळावर राज्यात सत्तेत आली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Maharashtra Lok Sabha Election : भाऊ आमचाच उमेदवार पुढे!

ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्ट्रीक करणार आहेत. तसेच, नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तिसऱ्यांदा संसदेत जाणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला. विकासाचा अजेंडा घेऊन महायुती पुढे चालली आहे. राज्यातील प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!