महाराष्ट्र

Fadanvis VS Thackeray : मी नागपुरी आहे, त्यांच्या स्तरावर जाऊन मला बोलता येत नाही !

Nagpur Culture : मी नागपुरी आहे मला त्याच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं. पण मला ते शोभत नाही.

Fadanvis VS Thackeray : लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोपांच्या फेरी झाडत आहेत. यामध्ये काही नेते स्तर सोडूनही बोलत आहेत. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे. त्यांच्या भाषेचा स्तर कितीही खालावला, तरी त्या स्तरावर जाऊन मी बोलणार नाही. कारण मी नागपुरी आहे. आपले संस्कार तसे नाहीत, असे ते म्हणाले.

आज (ता. 30) सायंकाळी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीच्या मुंबईतील परिस्थितीबाबत विचारले असता, मुंबईमधील तीन जागा भाजप आणि तीन जागा शिवसेनेने लढायच्या, अशा पद्धतीने अगोदर ठरलं होतं. सुरुवातीला तीन जागा लढायच्या म्हणून आम्ही तयारीदेखील केली होती आणि हे सर्व २० ते २५ दिवसांअगोदर ठरलं होतं.

उद्धव ठाकरे सध्या भाजप नेत्यांवर आग ओकत आहेत. त्यांच्याबद्दल विचारले असता, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असलेली निराशा त्यांच्याच टीकेतून दिसत आहे. मी नागपुरी आहे मला त्याच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं. पण मला ते शोभत नाही. मॅच्युअर्ड राजकारणी तसं बोलत नसतात. समोर हार दिसत असल्यामुळे अन् निराशा दिसल्याने ते शिवराळ भाषा बोलत आहे. शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना जवळ करणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

Lok Sabha Election : चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा पुन्हा महानालायक म्हणून उल्लेख

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात या निवडणुकीत जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. याबाबत नारायण राणे हे शिवसेनेच्या जास्त जवळ होते. पण त्या काळात आम्ही तिथे त्यांच्या सोबत नव्हतो. राणे साहेबांकडे त्याबद्दलची माहिती अधिक आहे. त्यांना आलेले अनुभव असतील. त्यांना आलेल्या अनुभवाच्या आधारावरच नारायण राणे बोलत असतील, असे फडणवीस म्हणाले.

या निवडणुकीत भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जास्त स्तुती करताना दिसतात. याबाबत छेडले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे. पाच वर्षांत मला जे काही महाराष्ट्रात जनतेने स्वीकारलं. ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे मोदी उभे होते म्हणून. त्यांच्या सहकार्यामुळे मी महाराष्ट्रात अधिक चांगलं काम करू शकलो. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!