Mahavikas Aghadi : राज्यात ईव्हीएमचा घोळ मोठ्या प्रमाणावर आहे. लोकांना त्यांचं मत कोठे जाते हे समजायला हवं. शेवटच्या एका तासात 76 लाख मतं का वाढली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुण्यात बोलत होते. एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही. खरं तर बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आता राजभवनात असायला हवं होतं. मात्र ते राजभवन सोडून गावाला गेले. लोक शेतात पूजा-अर्चा करण्यासाठी जातात. 30 नोव्हेंबरला शनी अमावस्या आहे. त्यामुळे शिंदे अमावस्येला पूजा अर्चा करण्यासाठी गेले. यावरुन त्यांची मानसिकता दिसून येते, असे म्हणत नाव न घेता ठाकरे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला.
निशाणा साधला..
महाराष्ट्र लेचापेचा नाही. आपला महाराष्ट्र देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसन ईव्हीएम विरोधातील आंदोलन पुढे नेतील. महाराष्ट्रात अशी आंदोलने सर्व ठिकाणी होतील, असेही ठाकरेंनी यावेळी म्हटलं. अदानीला येऊ देऊ नका, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी अदानींवर निशाणा साधला. दिल्लीवरून परतल्यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने त्यांच्या गावी निघून गेले आहेत. शिंदे त्यांच्या मूळगावी दरे या ठिकाणी मुक्कामी आहेत. अशातच त्यांच्या अंगात 105 ताप भरला आहे. त्यावरून ठाकरे आणि राऊत यांनी निशाणा साधला.
आढाव यांचं आंदोलन
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनस्थळाला ठाकरे यांनी भेट दिली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले. त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आढाव यांची भेट घेतली. उपोषणस्थळी येण्यासाठी विमानाऐवजी उद्धव ठाकरे थेट रस्ते मार्गाने आले. त्याचा खुलासाही यावेळी करण्यात आला. बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी येण्याची उद्धव ठाकरे यांनी घाई झाली होती. मुंबईवरुन तीन वाजता उद्धव ठाकरे यांचे विमान होते. त्या विमानाने आले असते तर पुण्यात पोहचण्यास उशीर झाला असता. यामुळे उद्धव ठाकरे यांनी रस्ते मार्गाने येण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे दुपारी चारपर्यंत ते उपोषण स्थळी पोहचले. मनोगत व्यक्त करताना ठाकरे यांनी ही माहिती दिली.
Eknath Shinde : काळजी घ्या!! एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली
सरकारची स्थापना होत नसल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. शिंदे राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जातात आहेत. अमावस्येचाच दिवस का निवडत आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याची तयारी नाही. उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठाऊक नाही. सर्वांचे चेहरे पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. अजित पवारांना तर बाजूला काढण्यात आलं आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.