Political War : पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील आरोप प्रत्यारोप होतच आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे. त्यांचे हिंदुत्वाशी काहीच नाते राहिले नाही, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मी हिंदुत्व नाही तर भाजपला सोडले.
आम्ही मोदी भक्त नाही देशभक्त आहोत
मी माझ्या भाषणाची सुरूवात देशभक्त बांधवांनो अशी करतो. मी देशभक्त बांधवांनो बोललेले चालत नाही का? तुमचा देशभक्त या शब्दावर आक्षेप आहे का? ज्या कुणाला देशभक्तवर आरोप आहे…मग ते फडणवीस का असे ना ते देशद्रोही आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. अशा लोकांना गेट आऊटच केले पाहिजे. देशभक्त असणे हा देशात गुन्हा आहे का? आम्ही मोदी भक्त नाही देशभक्त आहोत. मी भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले. पण मी भाजपाला लाथ घातली आहे, वापरा आणि फेकून द्या, हे भाजपाचे नवे धोरण आहे,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Sanjay Raut : औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडलं तर तू कोण?
काय बोलून गेले उपमुख्यमंत्री
बाळासाहेबांची गर्जना आठवते. ते म्हणायचे माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो.. हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यांनी सांगितले हे चालणार नाही. ते बदला. तेव्हापासून त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले. ही शोकांतिका आहे. बाळासाहेबांची सभा व्हायची… शिवशाहीचा भगवा झेंडा… कडवट हिंदू असं म्हटलं जायचं. आदर्श , शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझं कुटुंब माझी जबाबदारी या पलीकडे काही ऐकायला येत नाही”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यावर आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.