महाराष्ट्र

Shiv Sena : मुख्यमंत्रीपदासाठी उध्दव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी

Congress : संजय निरुपम यांची घणाघाती टीका; राजकीय शरणार्थी बनले

Political War : दिल्ली दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची मालिका सुरू आहे. या मालिकेत आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनीही उडी घेतली आहे. बाळासाहेब असताना देशातील दिग्गज नेते मातोश्रीची पायरी चढायचे, अशी आठवण त्यांनी करून दिली आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे मात्र सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसपुढे शरण आल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले आहे. मात्र उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे लोटांगण घालत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी मंगळवारी (दि.६) केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा लाचारीचे एक उदाहरण आहे, असे निरुपम म्हणाले.

पुणे, नाशिकमध्ये पूरस्थिती असून त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूरग्रस्तांसाठी मदतकार्य आणि उपाययोजना करत आहेत. त्यासाठी त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला. मात्र दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेस हायकमांडचे उंबरठे झिजवत आहेत, अशी खरमरीत टीका निरुपम यांनी केली.

Pravin Darekar : सोनियांच्या दर्शनासाठी ठाकरे दिल्लीत

प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचेय

मविआतला प्रत्येक नेता मुख्यमंत्री बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, असा टोला निरुपम यांनी लगावला. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांच्यासह आदित्य ठाकरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र उबाठाने यावर कुरघोडी करुन दिल्ली गाठली. मविआतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आपल्याच नावावर शिक्कामोर्तब व्हावे, यासाठीच उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आहेत. मात्र शरद पवार हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार नाहीत. त्यामुळे पवारांवर दबाव टाकण्यासाठी ते इंडि आघाडीच्या इतर नेत्यांना भेटणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक

लष्कर आणि रेल्वेनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे. जवळपास ८ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. वक्फ बोर्डावर लॅंड माफिया बसलेले आहेत. ते धर्माच्या नावाने देशातील कोट्यवधी रुपयांच्या जमीनी लुटत आहेत. वक्फ बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले आहे. मात्र या विधेयकाला इंडिया आघाडीने विरोध केला आहे. वक्फ बोर्ड देशातील संपत्तीची लूट करत आहेत. ही लूट थांबवण्यासाठी विधेयक येत असल्यास त्यावर उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, असा परखड सवाल निरुपम यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!