महाराष्ट्र

Shiv Sena : मुख्यमंत्रिपद बळकावून ठाकरेंनी केला विश्वासघात 

Dr. Raju Waghmare : उद्धव ठाकरे गटाने घेतला शंकराचार्यांचा फायदा

Mumbai : ज्योतिर्मठ येथील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मातोश्रीला भेट दिली. पालघर येथील साधु हत्याकांडाबाबत सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे कान टोचायला हवे होते, अशी अपेक्षा शिवसेना मुख्य सह प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

शंकराचार्य म्हणाले होते की “खरा हिंदू विश्वासघात करीत नाही” याच वक्तव्यावर डॉ. वाघमारे प्रतिक्रिया देत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जिवीत असे पर्यंत कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. याउलट उद्धव ठाकरे यांनी आपले ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतो सांगून स्वत: मुख्यमंत्रीपदाची खूर्ची बळकावली, हा विश्वासघात नव्हता का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्व सोडून सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन लाखो शिवसैनिकांना फसवले. हा विश्वासघात करणारे उद्धव ठाकरे हे शंकराचार्य यांच्या म्हणण्या प्रमाणे हिंदू कसे असू शकतात ? असा प्रश्न डॉ. राजू वाघमारे यांनी उपस्थित केला.

शंकराचार्यांचा वापर

लोकसभा निवडणुकीत हिरवे झेंडे फडकवत विशिष्ट समाजाच्या लोकांना सोबत घेतले. तरीही उद्धव ठाकरेंना स्वत:चा स्ट्राईक रेट राखता आला नाही. जनतेत गेलेली पत सुधारण्यासाठी आणि निवडणुकीत घसरलेला मतांचा टक्का सावरण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने शंकराचार्यांचा वापर केला की काय ? अशी शंका मनात येते, असे वाघमारे म्हणाले. शंकराचार्यांना यासाठीच मातोश्रीवर आमंत्रण देण्यात आले होते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Prakash Ambedkar : वंचित काढणार आरक्षण बचाव यात्रा!

नकली शिवसेनेला असली शिवसेना करण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांच्या मदतीने केला, अशी टीकाही डॉ. वाघमारे यांनी केली.

बाळासाहेबांचे विचार शिंदें यांच्या मध्ये 

शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वात मोठे गुरु समजले जातात. पण हिंदूत्वावर बोलण्या ऐवजी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलणे, हे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गक्रमण करीत आहेत, असेही वाघमारे म्हणाले.

हिंदूत्वाबाबत मनात जराही आस्था नसणारे राहुल गांधी, आषाढी वारीत सहभागी होणार, हे सांगत राज्यातील काँग्रेस नेते नाचत होते. परंतु वारीसाठी, वारकऱ्यांसाठी , महाराष्ट्राच्या आराध्य दैवत विठोबा माऊली साठी वेळ नसल्याचे कारण देऊन राहुल गांधी यांनी लाखो वारकऱ्यांचा व तमाम मराठी जनतेचा अपमान केला आहे, असा घणाघात देखील ड़ॉ. वाघमारे यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!