महाराष्ट्र

Shiv Sena : शिंदे व उद्धवसेना 5 जागांवर आमने-सामने

Assembly Election : विदर्भात कोण बाजी मारणार?; 2019 मध्ये लढले एकत्र

Eknath Shinde : शिवसेनेत फुट पडली तेव्हा विदर्भातील कार्यकर्ते आणि नेतेही विभागले गेले. आज दोन्ही बाजुंनी समान फौज आहे. एकमेकांच्या विरोधात प्रचार करण्याची देखील शिवसैनिकांची ही पहिलीच वेळ आहे. 2019 च्या निवडणुकीत एक चूल होती. मात्र आता दोन चुली झाल्या आहेत. त्यातही विदर्भातील 5 जागांवर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.

विदर्भात शिंदेसेना व उद्धवसेनेचा 5 जागांवर थेट सामना होत आहे. या जागांवर कोण बाजी मारेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.या पाच जागांमध्ये व रामटेक या मतदारसंघांचा समावेश आहे. बुलढाण्यात संजय गायकवाड (शिंदे सेना) व जयश्री शेळके (उद्धवसेना), मेहकरमध्ये डॉ. संजय रायमुलकर (शिंदेसेना) व सिद्धार्थ खरात (उद्धवसेना), बाळापूरमध्ये बळीराम शिरसरकर (शिंदेसेना) व नितीन देशमुख (उद्धवसेना), दर्यापूरमध्ये अभिजीत अडसूळ (शिंदेसेना) व गजानन लवटे (उद्धवसेना), तर रामटेकमध्ये आशीष जयस्वाल (शिंदेसेना) व विशाल बरबटे (उद्धवसेना) यांच्यात सामना रंगणार आहे. 

या लढतींवरून विदर्भात कोणत्या शिवसेनेची पकड घट्ट आहे, ते सिद्ध होईल. विदर्भातील विधानसभेच्या 62 जागांपैकी महायुतीत भाजपच्या वाट्याला 48, तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला 40 जागा आल्या आहेत. यापैकी 35 जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. विदर्भातील जागावाटपात शरद पवार गटाला 13 जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत अजित पवार गटाला जास्त जागा पदरात पाडून घेण्यात यश आलेले नाही. फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

उद्धवसेना व शिंदेसेनेला मात्र प्रत्येकी 9 अशा समान जागा मिळाल्या आहेत. विदर्भातील 9 ठिकाणी शरद पवार गटाची भाजपशी लढत होणार आहे. येथे शरद पवारांची फौज थेट भाजपशी भिडणार आहे. तर 4 ठिकाणी भाजपला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. अजित पवार गटाला दोन ठिकाणी काँग्रेसशी मुकाबला करायचा आहे. तर शिंदेसेनेला तीन ठिकाणी काँग्रेसशी पंजा लढवायचा आहे.

Nagpur : नितीन राऊत म्हणतात, ‘संविधानाचाच मुद्दा परिणामकारक’

पूर्वी एकत्र लढले

2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते एकत्र लढले होते. भाजपसोबत युती असल्यामुळे त्यांचा थेट सामना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबतच होता. पण 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह सत्तेत सामील होत शिवसेना पक्षावर दावा केला. प्रकरण न्यायालयात गेलं. पण खरी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल लागला. मात्र त्यामुळे कार्यकर्ते व नेते विभागले गेले. पूर्वी एकत्र लढलेले लोक आता एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!