Maharashtra Politics : राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात, त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा केला पाहिजे. काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका महाराष्ट्र आणि देशासमोर आलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण जनतेला वेगळ्या ट्रॅकवर नेण्यासाठी अशा पद्धतीच वक्तव्य करत करत असल्याचा आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
मंत्री सामंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नरेटीव सेट केला होता. त्याला उत्तर देण्याचे काम राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन केले. मलमपट्टी लावण्याचे काम सध्या पृथ्वीराज चव्हाण करत आहे. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत. त्यांनी स्वप्न बघत राहावं. पूर्वी काँग्रेसची सत्ता का गेली याचही आत्मचिंतन त्यांनी करावं.
पंतप्रधान वर्धा जिह्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 तारखेला वर्ध्यात येत आहे. त्या नियोजनाच्या बैठकीसाठी वर्ध्याला जाण्यासाठी उदय सामंत नागपुरात आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते. अमरावतीमध्ये पीएम टेक्सटाईल पार्क घोषित झालं होतं. त्याचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या कामाचा आढावा घेण्यासाठी वर्ध्याला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
गुलाबराव पाटील यांनी जागा वाटपाबाबत वक्तव्य केले होते. याबद्दल विचारले असता, गुलाबराव पाटलांना त्यांच्या सुत्रांकडून काही माहिती मिळाली असेल. तर त्याबद्दल मला माहिती नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये बैठका झालेल्या आहेत. आमच्या तिकीट वाटपानंतर कुठली ब्रेकिंग मिळणार नाही, याची तजविज महायुतीने करून ठेवली आहे.
निवडणुका कधी जाहीर होतील याबद्दल माहिती नाही. महाविकास आघाडीच्या अगोदर आमची चर्चेला सुरुवात झाली. महायुतीत रस्सीखेच नाही. तिन्ही पक्षाच्या लोकांमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल. टेंभी नाका घटनेवर विचारले असता, आनंद दिघे यांच्या आश्रमात अशा पद्धतीचे कृत्य जर कोणी करत असेल त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचले पाहिजे. त्याचा हेतू काय होता हेदेखील समोर आलं पाहिजे, असे सामंत म्हणाले.
चौकशी होइल
बाळा मानेकर यांच्या उमेदवारीपद्दल विचारले असता, लोकशाहीमध्ये अपक्ष माणसाला उभे राहण्याचा अधिकार आहे. पक्षाच्या माणसालादेखील तोच अधिकार आहे. कुणी इच्छा व्यक्त करू शकतं. विचार व्यक्त केला, बॅनर लावले म्हणून त्याप्रमाणे तिकीट वाटप होणार नाही, असे ते म्हणाले. एन एम ग्लोबल कोलवाशरी संदर्भात तक्रार आली तर नक्कीच उद्योगमंत्री म्हणून त्याची चौकशी केली जाईल. त्यात तथा आढळलं तर कारवाईसुद्धा केली जाईल, असे उदय सामंत म्हणाले.