महाराष्ट्र

Rohit Pawar : आमदार अमोल मिटकरी यांना म्हणाले चंगू मंगू 

NCP Politics : मिटकरी यांच्या ट्विटनंतर शाब्दिक फटकार 

Criticism On Leader Post : महाराष्ट्रातील दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला रोहित पवार यांनी शाब्दिक फटकारे देत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रतोद पदी दिवंगत माजी मंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर ट्विट करीत रोहित पवार यांना चिमटा काढला. ट्विट मध्ये मिटकरी यांनी जाणीवपूर्वक जयंत पाटील आणि रोहित पाटील यांना टॅग केले. या पोस्टमध्ये मिटकरी म्हणाले की, जयंत पाटील यांनी रोहित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला. रोहित पाटील यांना पक्षाचे प्रतोदपद दिले आहे. मिटकरी यांनी स्वतःहून ओढवून घेतलेल्या या वादानंतर रोहित पवार यांनी त्यांचा उल्लेख चंगू मंगू असा केला आहे.

पुण्यात प्रतिक्रिया 

पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की पक्षाची बैठक झाली त्यावेळी शरद पवार हे देखील उपस्थित होते. रोहित पाटील यांचे नाव आपणच सुचवलेले आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड आणि उत्तम जानकर यांच्या नावाचा प्रस्तावही आपणच दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्यावर अन्याय झाला असं बोलणं चुकीचं आहे. कोणीही चंगू मंगू उठतो आणि काहीही बडबड करतो. काही संवैधानिक पदावर आपल्या नावाची शिफारस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाच्या बडबडीने काही फरक पडत नाही, असंही रोहित पवार म्हणाले.

Nana Patole : नोकर भरतीची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांना

कोणत्याही पक्षाची प्रतोदपद महत्त्वाचे असते. रोहित पाटील हे जरी नवीन असले तरी राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले आहे. शरद पवार यांनी नेहमीच तरुणाईला संधी दिली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रस्तावाला नियुक्तीच्या माध्यमातून कौतुकाची थाप दिली. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये परंतु पदाचे काम आपल्याला ठाऊक झाले आहे. त्यानंतरही पुन्हा आपलं नाव पुढे करणे योग्य वाटलं नाही, असंही रोहित पवार म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार असतानाही आपण कधीही पदासाठी अट्टहास केला नाही. आपण काम करीत राहिलो. पक्षाला योग्य वाटेल तेव्हा योग्य पद आपल्याला मिळेल. मात्र काही लोकांना चमकोगिरी करण्यासाठी काही ना काही मुद्दे लागत असतात. अशा चंगू मंगूंना त्यांच्याच पक्षाकडून मग फटकारे बसतात. त्यानंतर काही लोक शहाणे होतात. परंतु काही लोकांना शहाणपण येतच नाही. त्यामुळे अशा चंगू मंगूंना आपण कोणते उत्तर देणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांची खिल्ली उडवली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!