महाराष्ट्र

Tumsar APMC : सभापती उपसभापती पदासाठी ‘खेला होबे’

Election : तुमसर- मोहाडी बाजार समिती निवडणूक?

Bhandara District  : भंडारा जिल्हाच्या तुमसर – मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज (28 मे) रोजी होत आहे. या निवडणुकीत असंतुष्ट संचालक गेम करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एक तर निवडणूक अविरोध होईल अथवा बाजी पलटण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे आज होणाऱ्या निवडणुकीत ‘खेला होबे’ची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

तुमसर – मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यासह राज्यात गाजत आहे. या निवडणुकीत एकमेकात विस्तव न जाणाऱ्या राजकीय पक्षांचे नेते एकाच पॅनलमधून निवडणूक लढवून विजयी झाले. त्याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली. त्यामुळे संबंधित पक्षाचे वरिष्ठ नेते येथील घडामोडींवर बारिक लक्ष ठेवून आहेत. येथील निवडणुकीत सभापतीपदी बळीराजा जनहित पॅनलचे प्रमुख भाऊराव तुमसरे यांची निवड पक्की मानली जात आहे. तर उपसभापती पदी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे (राष्ट्रवादी अजित पवार गट) राजू माटे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.

दुसरीकडे बळीराजा जनहित पॅनल व शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांची युती होण्याची अधिक शक्यता आहे. या दोन्ही पॅनलकडे बहुमताचा आकडा असल्याने येथे सभापती व उपसभापती पद त्यांना मिळण्याची अधिक शक्यता आहे. बहुमताकरिता 10 संचालकांची गरज आहे.

सत्तेच्या खेळात काहीही होऊ शकते

सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने हातमिळवणी करून सभापती व उपसभापतीपद हस्तगत करण्याकरिता जोरदार प्रयत्न चालविले आहेत. आज मंगळवारी चित्र स्पष्ट होणार आहे. ‘सहकार क्षेत्रात कोणी कोणत्याही गटात जाऊन निवडणूक लढू शकतात,’ असे सांगणारे नेतेच आता तोंडघशी पडल्याचे दिसून येत आहे. आठडाभरापूर्वी एकमेकांविरोधात लढलेले दोन्ही पॅनल एकत्र येऊन सत्ता स्थापण्याच्या प्रयत्नात असल्याने काहीही होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!