महाराष्ट्र

APMC Election : तुमसर बाजार समिती निवडणूक

Local Body : 58 उमेदवारात थेट लढत

Tumsar APMC : विदर्भात प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अडीच वर्षापासून रखडली होती. उच्च न्यायालयाने तीन महिन्यात बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम घोषित झाला. आता निवडणूक 12 मे रोजी होत असून 13 मे रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे तालुक्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे.

तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 72 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता 58 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी तुमसर-मोहाडी तालुक्यात 7 मतदान केंद्र असणार आहेत.त्यात तुमसर तालुक्यात तुमसर, सिहोरा, नाकाडोंगरी, मिटेवानी हे 4 मतदान केंद्र तर मोहाडी तालुक्यात मोहाडी, आंधळगाव, करडी असे 3 मतदान केंद्र आहेत.

Lok Sabha Election : अनेक जण मतदानापासून वंचित, ‘त्या’ दोषी ‘बीएलओं’वर कारवाई होणार !

तिन्ही पॅनल मध्ये विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने वेगळे राजकीय समीकरण होण्याची दाट शक्यता आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी, जयकिसान, बळीराजा अशा 3 वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे पॅनल स्थापन झाले आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, विकास फाउंडेशन आमने-सामने येणार आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, राय दयाल पारधी व कृ.उ. बा. स. माजी सभापती भाऊराव तुमसरे येथे यांचा राजकीय कस लागणार आहे. सेवा सहकारी गटात तुमसर तालुक्यात 762 तर मोहाडी तालुक्यात 544 असे एकूण 1306 मतदार आहेत. तुमसर-मोहाडी तालुक्यात 105 सेवा सहकारी संस्था आहेत. ग्रामपंचायत गटात तुमसर 97 ग्रामपंचायती असून मतदारांची संख्या 897 तर मोहाडी तालुक्यात 75 ग्रामपंचायती असून त्यात 676 मतदार आहेत. यात तुमसर-मोहाडी तालुक्यात 172 ग्राम पंचायती आहेत. अडते व्यापारी गटात 502 तर हमाल मापारी गटात 201 इतकी मतदारांची संख्या आहे. त्यामुळे तुमसर-मोहाडी बाजार समितीची निवडणूक रंगतदार ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!