महाराष्ट्र

Rajkumar Badole : बडोलेंच्या स्वप्नात महायुती ठरणार अडसर !

Tribal brothers : आदिवासी बांधवांचे पुन्हा केले एकत्रिकरण 

Gondia District Politics : आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क, अधिकार, रोजगार, शिक्षण, स्वाभिमान यांची माहिती व्हावी, यासाठी रविवारी (ता. 8) धाबेपवनी येथे राजकुमार बडोले फाउंडेशनच्यावतीने, ‘आदिवासी परिषद’ पार पडली. राजकुमार बडोले फाऊंडेशनतर्फे आयोजित आदिवासी परिषदेला मोठ्या संख्येने आदिवासी स्त्री-पुरूषांनी हजेरी लावली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आदिवासी ध्रुव गोंड समाज अध्यक्ष एम. डी. ठाकुर होते. परिषदेचे उदघाटन प्रदेश सचिव प्रकाश गेडाम यांनी केले. माजी आमदार संजय पुराम, हनवंत वट्टी व डॉ. चंदा कोडवते यांनी मार्गदर्शन सेले. माजी मंत्री राजकुमार बडोलें यांनी पुन्हा एकदा आदिवासी बांधवांना एकत्र केल्याने विधानसभेची दावेदारी करत असल्याची चर्चा रंगत आहे.

जीवन बदलण्याचा संकल्प

राजकुमार बडोले म्हणाले आदिवासींची संस्कृती, शिक्षण, स्वाभिमान, सायन्स, सन्मान आणि रोजगार या पंचसूत्रीच्या माध्यमातून आदिवासींचे जीवन बदलण्याचा संकल्प आहे. त्यासाठी आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत. यातून आदिवासींच्या सर्वागिण विकासाचा संकल्प घेऊन जा आणि आपल्या घरावर ही पंचसूत्री लिहून ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, जल, जंगल आणि जमिनीचे खरे मालक तुम्ही आहात.

News Districts : नवीन जिल्ह्यासाठी नव्या सरकारची वाट बघावी लागणार ?

भविष्य घडवूया

जमिनींचा सातबारा तुमच्या पिढ्यांच्या नावे होता. या देशाचे मुलनिवासी तुम्ही आहात. तुमचा इतिहास वैभवशाली आहे. तो परत मिळविण्याच्या संकल्पासह विकासाच्या दिशेने पुढे चला. तुमचा भूतकाळ सुवर्ण होता. तसे भविष्य घडवूया. स्थानिक प्रश्नावर बोलताना त्यांनी वनहक्क दावे त्वरीत निकाली काढुन, वनजमीनीचे पट्टे शेतकऱ्यांना देण्यात यावे, झाशी नगर उपसा सिंचन योजनेचे पाणी झाशी नगर रामपुरी, येलोडी, धाबेपवनी या भागातील बारा गावांतील शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी पुढील काळात काम करण्याचे आश्वासन दिले.

आदिवासी गोंडी भाषेचे संवर्धन करण्यासाठी अनुसुची नऊमध्ये सामील करावे. याबाबत आपण आग्रही असल्याचे सांगितले. स्थानिक आदिवासी तरुणांना पोलिस भरती, पटवारी, ग्रामसेवक, यांसारख्या ग्रामीण नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, याबाबत सरकारकडे पाठपुरावा करीत आहे, असे ते म्हणाले.

बडोलेंची वाट अवघड..

बडोलेंच्या स्वप्नांना महायुतींचा खोडा निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप महायुतीत लढणार आहे. बडोले हक्क दाखवत असलेली मोरगाव अर्जुनी ही जागा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आधीच बळकावून ठेवली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट या विधानसभेच्या जागेवर ताकतीने हक्क सांगणार यात दुमत नाही. त्यामुळे बडोलेंची वाट अवघड होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!