Political War : शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. आता तुकाराम मुंढे हे विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा असा खोचक टोला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला लगावला आहे.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून हटविले आहे. विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर नियुक्त त्यांना करण्यात आले आहे. त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदलीनंतर आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. दरम्यान, यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनीही राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.
विजय वडेट्टीवर यांनी 18 जून रोजी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना तुकाराम मुंढे यांच्या बदली विषयी देखील विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, त्यांची बदली आता अमेरिका किंवा चीनला करा, अशी बोचरी टीका वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर केली आहे.
धडाकेबाज नेतृत्व आणि त्यांच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून तुकाराम मुंढे यांना हटविण्यात आले आहे. आता तुकाराम मुंढे यांची विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. तुकाराम मुंढे यांची सातत्याने बदली होत असते. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली करत आहे तर कायद्यात दुरुस्ती करा आणि अमेरिकेत किंवा चीनमध्ये त्याची बदली करा, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यांची अमेरिकेत किंवा चीनमध्ये बदली झाल्यास कोणाला त्रासच नको, असेही खोचकपणे त्यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले..
मला वाटतं की त्यांची बदली आता थेट अमेरिकेतच केली पाहिजे. त्यांची देशात कुठेही बदली केली, तरी त्यांचा त्रास होणारच आहे, अशी राजकीय नेत्यांनी भावना आहे. मग ते आधीचे राजकारणी असोत, किंवा आताचे असो. मात्र, त्यांची एकदाच काय ते अमेरिकेत किंवा रशियात बदली करावी, अती आवश्यक वाटल्यास त्यांनी चीनमध्येही पाठवावे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.