महाराष्ट्र

IAS Puja Khedkar : दिव्यांग प्रमाणपत्र दिले नगरच्या रुग्णालयाने 

UPSC Appointment : चौकशीला सुरुवात झाल्यानंतर आले उघडकीस 

Enquiry Started : पूजा खेडकर यांच्यावर लोकसेवा आयोगापुढे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दृष्टिहीन व मानसिक आजारी असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर केले. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिले आहे. अभिलेख तपासणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. बोगस प्रमाणपत्र सादर केल्याने पुजाला आयएएस होण्यास मदत झाली असा आरोप आहे. आता नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्यांना ही दोन्ही प्रमाणपत्रे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्ताऐवज तपासल्यानंतर ही नोंद आढळली.

पूजा खेडकर यांना 2018 मध्ये नेत्र दिव्यांग अर्थात दृष्टिहीन व 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना डोळे व मानसिक आजाराचे संयुक्त प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांनी ते तत्कालीन वैद्यकीय मंडळाला सादर केले. पूजा खेडकर या दिव्यांग प्रमाणपत्राच्या मदतीने सनदी अधिकारी झाल्या आहेत. त्यांची प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पुण्यात नियुक्ती झाली होती. पण खासगी वाहनावर लाल दिवा लावल्यामुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दालन बळकावल्यामुळे त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे. सध्या पूजा विदर्भातील वाशिममध्ये कार्यरत आहेत.

नॉन क्रिमीलेअरही वादात 

पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासह नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडले. खेडकर यांच्या वडिलांची 40 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यामुळे त्या ओबीसी नॉन क्रिमिलेअरमध्ये कशा मोडतील असा प्रश्न आहे.

IAS Puja Khedkar : आई-वडिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा 

पूजा खेडकर या सुमारे 17 ते 22 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या मालकीण आहेत, असे सांगण्यात येत आहे. 2023 मध्ये रुजू होण्यापूर्वी सरकारला दिलेल्या मालमत्तेच्या तपशीलात, पूजा यांनी सांगितले की त्यांनी 2015 मध्ये म्हाळुंगे, पुणे येथे 2 भूखंड खरेदी केले. यामध्ये त्यांनी एक प्लॉट 42 लाख 25 हजार रुपयांना तर दुसरा प्लॉट 43 लाख 50 हजार रुपयांना खरेदी केला. सध्या दोन्ही भूखंडांचे बाजारमूल्य 6 ते 8 कोटींच्या आसपास आहे.

पूजा यांनी 2018 मध्ये पुण्यातील धानेरी परिसरात 4.74 हेक्टर जमीन 20 लाख 79 हजार रुपयांना खरेदी केली होती. त्याची सध्याची किंमत 3 ते 4 कोटी रुपये आहे. पूजा यांनी 2020 मध्ये केंधवा येथे 724 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट 44 लाख 90 हजार रुपयांना खरेदी केला होता, ज्याची किंमत सध्या 75 लाख रुपये आहे. पूजा यांच्या नावावर अहमदनगरमध्येही तीन मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या आईने त्यांना 2014 मध्ये दोन जमिनी भेट म्हणून दिल्या. त्यांची किंमत सुमारे 1.25 कोटी रुपये आहे. पूजा यांनी स्वत: 2019 मध्ये सावेडी येथे 20 लाख 25 हजार रुपयांना जमीन खरेदी केली होती. सध्या त्याची किंमत 45 लाख रुपये आहे. मालमत्तांमधून पूजा दरवर्षी सुमारे 42 लाख रुपये कमावत आहेत, असा आरोप आहे. या सर्व आरोपांची चौकशी केंद्र सरकारने सुरू केली आहे.

error: Content is protected !!