महाराष्ट्र

Assembly Election : खाजगी जागेत झेंडे लावले तर पक्ष येणार अडचणीत

Maharashtra : आदर्श आचारसंहिता; पत्रके, स्टिकर्स चिपकवण्यावरही बंदी

Political Party : विधानसभा निवडणूकीचे तिकीटवाटप अखेर पूर्ण झाले आहे. आता काही उमेदवार अर्जदेखील मागे घेतील. 4 नोव्हेंबरपासून संपूर्ण विदर्भात प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात होईल. मात्र आदर्श आचारसंहितेत राजकीय पक्षांना अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरावे लागणार आहे. खाजगी जागांमध्ये झेंडे, भित्तीपत्रके लावली तर पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षांच्या सूचनांचे कार्यकर्ते किती पालन करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

उत्साही नेते 

निवडणूक काळात कार्यकर्ते अधिक उत्साही असतात. मात्र, अतिउत्साहात नियम मोडला गेल्यास त्यावर निवडणूक यंत्रणेची नजर राहणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांनीही प्रचार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. बहुसंख्य उमेदवार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, उमेदवाराचा प्रचार करताना कार्यकर्त्यांनाही आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. त्यांच्यावरही काही नियम, निर्बंध घातले आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण यंत्रणेला निर्देश दिले आहेत. त्यासाठी आढावासुद्धा घेतला जाणार आहे.

खासगी जागेत झेंडे, भित्तीपत्रके लावण्यासाठी मालकाच्या परवानगीची आवश्यकता असते. भिंतीवर घोषणा लिहिण्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी आवश्यक आहे. भिंतीवर प्रचार जाहिरात लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

सोबतच प्रचार वाहनांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. अर्ज, वाहनाचे आरसी बुक, वाहनाचा विमा, कर भरणा पावती, पीयूसी, फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. वाहनाच्या चारही बाजूंचा फोटो नाहरकत प्रमाणपत्रासाठी दाखवावा लागणार आहे. सोबतच प्रचार वाहन, ध्वनिक्षेपक भोंगे, बॅनर अशा सर्वच घटकांसाठी त्या त्या विभागांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Diary of a Home Minister : मी पाठमोरा आणि पाठीत तीन खंजीर!

धनिक्षेपक..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. सकाळी सहा वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर धनिक्षेपक वापरावर बंदी आहे. ध्वनिक्षेपकासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. फिरणाऱ्या वाहनांना एका ठिकाणी थांबूनच प्रचार करावा लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!