महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांची प्रतीक्षा संपली

Chatrapati Shivaji Maharaj : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Maharashtra Government : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात येणार आहेत. गुरुवारी (ता. 18) ही वाघनखं साताऱ्यात आणण्यात येणार आहेत. 19 जुलैला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळा होणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 

वाघनखं आणण्याासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनला दौरा केला होता. आता लंडनच्या व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. त्यानंतर साताऱ्यातील संग्रहालयात पुढील 10 महिने ती इतिहासप्रेमींसह, शिवप्रेमी, नागरिकांना पाहता येणार आहेत. गुरुवारी सायंकाळी ही वाघनखं महाराष्ट्रात आणली जातील. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहतील. मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar : म्हणून जयंत पाटील विधान परिषदेत पराभूत झाले

शुक्रवारी (ता. 19) सकाळी 11 वाजता सातारा येथे वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल. या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि स्वतः सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात प्रतापगड विकास प्राधिकरणाची घोषणा केली जाईल. मुख्यमंत्री शिंदे याची घोषणा करतील, अशी माहिती आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनाही ही वाघनखं पाहता येणार आहे. त्यासाठी सरकारने यापूर्वीच वेळापत्रकाची व कार्यक्रमांची घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झालेत. यानिमित्त सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत राज्यभरात विशेष कार्यक्रम राबविले. महाराजांनी वापरलेली वाघनखं आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. भारत पाकिस्तान सिमेवरही मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते.

Sharad Pawar : म्हणून जयंत पाटील विधान परिषदेत पराभूत झाले

निर्धार पूर्ण होणार

छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही आज कुठे असतो याची जाणीव असणारे हे सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हेच आजच्या सर्व समस्यांवरचे उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार मुनगंटीवार यांनी यापूर्वी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी हजार सत्ता ओवाळून टाकू, सत्ता येते जाते, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कायम असेल, असेही ते म्हणाले होते. आता सांस्कृतिक मंत्री यांनी केलेला निर्धार लवकरच पूर्ण होणार आहे. हे विशेष.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!