महाराष्ट्र

Maharashtra Lok Sabha Election : दादा, राणे, शिंदे, सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला

Third Phase : महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी 19 एप्रिलला पहिला टप्पा आणि 26 एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला. मंगळवार, 7 मे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.राज्यातील बारामती, सांगली, कोल्हापूर, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, माढा, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

देशात 93 मतदारसंघांत एकूण 1,351 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आजच्या टप्प्यात गुजरात राज्यामध्ये सर्व 26 जागांसाठी मतदान होणार आहे. आसाममधील 4 जागा, बिहार 5, छत्तीसगड 7, गोवा 2, कर्नाटक 14, मध्य प्रदेश 8, महाराष्ट्र 11, उत्तर प्रदेश 10, पश्चिम बंगाल 4, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव प्रत्येकी 2, जम्मू काश्मीर मध्ये 1 जागेसाठी मतदान होणार आहे.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या पत्नी, सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पहाटेच मतदान केले.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमधील लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. हा मतदारसंघ कायम राखणे हे शरद पवार यांच्यासाठी जसे प्रतिष्ठेचे आहे तसेच अजित पवार यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. बारामतीच्या निकालावर अजित पवार यांचे महत्त्व ठरणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधुन केंद्रीय मंत्री नारायण राणे तर सातारा मतदारसंघातून उदयनराजे निवडणूक लढवत आहेत. सोलापुरमधून महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे या मैदानात आहेत. तर महायुतीकडून राम सातपुते निवडणूक लढवत आहेत. कोल्हापूरमध्ये महायुतीच्या संजय मंडलिक आणि मविआच्या छत्रपती शाहू महाराजांमध्ये सामना रंगणार आहे.

Jalgaon Lok Sabha : मतदानापूर्वी जळगाव प्रशासनाने ‘त्यांना’ हाकलले

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

राज्यात आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटलेली आहे. वाढत्या उन्हाचाही परिणाम लोकशाहीच्या महोत्सवावर झाले ला दिसला. मतदान केंद्रावरील गैरसोयीचा परिणाम टक्केवारीवर होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्यासाठी थंड पाणी, सावलीसाठी 789 केंद्रावर पेंडोल, केंद्रावरील खोल्यांमध्ये पंखा, बसण्यासाठी खुर्च्या या सुविधा राहतील. मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयारी केली होती. मात्र, 8 दिवसांपासून वाढते कडाक्याचे ऊन, वातावरणातील वाढलेली आर्द्रता, यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे.

error: Content is protected !!