Last Date Soon : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. अजूनही अर्ज भरण्याची तारीख असल्याने दररोज नवे अर्ज प्राप्त होत आहेत. आधी अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांचे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत. तर या महिन्याचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका योजनेची जोरदार चर्चा आहे. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
लवकर पुन्हा भेट
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारकडून अनेक योजनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करत राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली. राज्यात ऑगस्ट महिन्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. सुरुवातीला लाभार्थी महिलांना या योजनेचा अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्य सरकारकडून अनेक नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे लाभार्थी महिलांना ही योजना अधिक सोपी झाली. आता या योजनेत लाखो महिलांनी अर्ज सादर केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरले आहे. तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड (Raigrah) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती आहे. मात्र आधार सिडिंग करणं आवश्यक आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे. सुरुवातीला या योजनेची मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. त्यानंतर सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुभा दिली होती. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत. तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या नव्याने अर्ज करण्यासाठी महिलांची लगबग कायम आहे. महाराष्ट्रातील एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे सरकार सातत्याने सांगत आहे.
शिबिरांचे आयोजन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून राज्यभरामध्ये नाव नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक जवळ असल्याने या योजनेतील कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी काढण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र निवडणूक आटोपल्यानंतर अनेक अर्ज पात्र करण्यात येतील असा विरोधकांचा आरोप आहे.