देश / विदेश

Tamil Nadu : विधानसभेत राडा; सदस्यांची सभागृहातून हकालपट्टी

Liquor Scam : बनावट दारू पिल्याने अनेक लोकांचा मृत्यू

Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये भेसळयुक्त दारू पिल्याने अनेक लोकांनी जीव गमावला आहे. आतापर्यंत 47 लोकांचा भेसळयुक्त दारू पिल्याने मृत्यू झाला आहे. अशातच राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. आतापर्यंत तीन आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या (AIADMK) सदस्यांनी कल्लाकुरिची येथील अवैध देशी दारूच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अनेक पक्षाच्या सदस्यांना सभागृहाबाहेर हाकलण्यात आले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या आवाहनानंतर विरोधी सदस्यांची हकालपट्टी रद्द करण्यात आली.

लोकशाहीची हत्या

तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते के. पलानीस्वामी यांनी नंतर सांगितले की, अधिवेशनादरम्यान AIADMK सदस्यांनी कल्लाकुरिची येथील अवैध देशी दारूच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु “आम्हाला तसे करण्याची परवानगी देण्यात आली नाही आणि पक्षाच्या सदस्यांना हाकलून देण्यात आले, असे पलानी स्वामी म्हणाले.” त्यांनी ‘एआयएडीएमके’च्या सदस्यांना सभागृहातून बाहेर काढण्याच्या कृतीला “लोकशाहीची हत्या” असे म्हटले आहे. पलानीस्वामी यांनी दावा केला की कल्लाकुरिची येथे अवैध देशी दारू पिल्याने 50 लोकांचा मृत्यू झाला.

विधानसभेचे अधिवेशन 29 जूनपर्यंत

तमिळनाडूमध्ये भेसळयुक्त दारूचे सेवन केल्याने आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मुद्दा राज्यात चर्चेत असून, 21 जून शुक्रवारी विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही विरोधकांनी गदारोळ केला. अनेक आमदारांना विधानसभेतून बळजबरीने हाकलून दिले आणि नंतर परत बोलावण्यात आले.

Bhandara-Gondia : लोक म्हणताहेत.. नानांचा ‘तो’ रात्रीचा गोंधळ बरा होता

येथे विधानसभेचे अधिवेशन 29 जूनपर्यंत चालणार आहे.अशा स्थितीत येत्या काही दिवसांत या विषयावर चर्चा निश्चित आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तमिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल यांनी केली चिंता व्यक्त

कल्लाकुरीची येथे बनावट दारूच्या सेवन केल्याने अनेकांचा जीव गेला, हे जाणून मला खूप धक्का बसला. इतर अनेक जण गंभीर अवस्थेत आपल्या जीवाशी लढा देत आहेत. शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना लवकरात लवकर बरे होवो. “राज्याच्या विविध भागांतून बनावट दारूच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली.

सीएम एमके स्टॅलिन यांनी विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर दारूमुळे आजारी पडणाऱ्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती बी गोकुळदास यांना या प्रकरणाची चौकशी करून 3 महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती गोकुळदास हे चौकशी समितीचे एकमेव सदस्य आहे.

error: Content is protected !!