महाराष्ट्र

Abhijeet Wanjari : आघाडीत कोणताही संघर्ष नाही

Congress : मतदारसंघातील पक्षाची स्थिती जाणून घेणे महत्वाचे

Assembly Election : जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी कोणताही वाद नाही. तिकीट मागण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळं संघर्ष वैगेरे काही नाही. मात्र त्या-त्या मतदारसंघातील त्या पक्षाची स्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेसचे विधान परिषद आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले. ते सोमवारी (21 ऑक्टोबर) नागपुरात बोलत होते. 

दक्षिण नागपूर ही पारंपारिक काँग्रेसची जागा राहिली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे अनेक आमदार विजयी झाले आहेत. दक्षिण नागपूरचे पहिले आमदार आपले वडील होते. त्यामुळे हा काँग्रेसचा गड काँग्रेसकडेच राहावा, अशी अपेक्षा आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केली. राजकारणात सध्या जी परिस्थीती आहे, त्यावर निर्णय किंवा भाष्य केलं जातं. सध्या काँग्रेसचे नागपुरातील आमदार दिल्ली जात आहेत. विदर्भातील जास्तीत जास्त जागा काँग्रेसने लढाव्या, अशी विनंती नेत्यांची भेट घेऊन करणार आहोत, असं त्यांनी नमूद केलं.

संख्याबळ महत्वाचं

आमदार अभिजित वंजारी म्हणाले की, ज्या जागेवर काँग्रेसचे संख्याबळ होते. या सर्व ठिकाणी आम्ही उमेदवारांची मागणी करणार आहोत. सहा जिल्ह्यांचा आमदार, जिल्ह्याचा प्रभारी असल्याने त्या सर्व जिल्ह्यांतील मागणी आपण करणे रास्त आहे, असंही त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसच्या काही हक्काच्या जागांवर दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा वाद विकोपाला गेल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांसह ठाकरे गटानेही हा दावा फेटाळला आहे, पण सूत्रांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबतच्या बैठकीत राज्यातील काँग्रेस नेते या मुद्यावरून चांगलेच आक्रमक झाल्याची माहिती आहे.

PDKV Akola : कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंविरोधात हक्कभंग

ठाकरे गटाने विदर्भातील काही जागांवर दावा सांगितल्यामुळे हा वाद सुरू झाला. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाच्या आडमुठ्या भूमिकेवर चांगलाच संताप व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसनेच आघाडीचा धर्म का पाळायचा? अशा विविध सवालांची सरबत्ती यावेळी काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर केली. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने ज्या ठिकाणी पक्षाचे संघटन नाही, त्या ठिकाणच्या जागांचा हट्ट धरला नाही, अशी बाबही त्यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रकरणी ठाकरे गटाकडे ताठर भूमिका सोडण्याचीही अपेक्षा व्यक्त केली. मात्र प्रचंड वाद असल्याच्या चर्चा अफवा असल्याचं वंजारी म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!