महाराष्ट्र

Lok Sabha Election : “त्या” दोघांची होणार विभागीय चौकशी!

Strick Action : निवडणूक कर्तव्यावर दारू पिऊन झोपी जाणे प्रकरण

Bhandara gondia constituency : निवडणूक निरीक्षक (खर्च) व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या भेटीदरम्यान भंडारा जिल्ह्याच्या निलज चेक पोस्ट येथे अधिकारी व कर्मचारी मद्यप्राशन करून तंबूत झोपले होते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली.या सोबतच या दोघांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश प्रस्तावित असून तसा अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक काळात अशा घटना गंभीरपणे घेतल्या जात असून हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे यावरून दिसते.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ अंतर्गत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भंडारा येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पवनी पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी एल. जे. कुंभारे व पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपिक सचिन पढाळ यांची नियुक्ती पवनी तालुक्याच्या निलज चेक पोस्ट या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये करण्यात आली होती. 5 एप्रिल रोजी निवडणूक निरीक्षक (खर्च) व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या चेक पोस्टला भेट दिली. यावेळी पवनीचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी तिथे उभारण्यात आलेल्या तंबूमध्ये विस्तार अधिकारी कुंभारे व लिपिक पढाळ हे कर्मचारी झोपलेले होते. त्यांना जागे करीत निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर हजर करण्यात आले. या दोघांनाही अधिकाऱ्यांशी योग्यपणे संवाद साधता आला नाही. प्राथमिक तपासात दोघेही मद्य प्राशन करून झोपले असल्याचे समोर आले. दोघांनाही तत्काळ वैद्यकीय तपासणीकरिता पोलिसांसह रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार यांनी स्वतः पंचनामा केला. निर्देशानुसार पोलिस निरीक्षक यांना आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले

Lok Sabha Election : कर्तव्यावर मद्यप्राशन भोवले, भंडाऱ्यात कर्मचारी निलंबित

.

नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी मद्यप्राशन केल्याचे प्रमाणपत्रही वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाले. तसेच भंडारा येथील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार पवनीचे तहसीलदार यांनी पवनी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.एकंदरीत संपूर्ण प्रकरणात अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर करणारी बाब केल्याने निवडणूक विषय कामकाजात बेजबाबदार वर्तन दर्शवित असल्याचा ठपका ठेवण्यात आला. यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 कलम, 28 अन्वये तसेच संदर्भ क्रमांक तीन अन्वये या दोघांनाही तत्काळ निलंबन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.दरम्यान हे प्रकरण निलंबनावर न थांबता त्या दोन्ही अधिकाऱ्याची विभागीय चौकशी होणार असल्याचे सामोर आले आहे.त्यामुळे हे प्रकरण अधिकच अंगलट आल्याचे बोलले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!