महाराष्ट्र

Nagpur : पश्चिम नागपूरमधून सुधाकर कोहळे?

Sudhakar Kohle : भाजपकडून उमेदवारीचे ‘सरप्राईज’?; कामाला लागण्याच्या सूचना

Assembly Election : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राजकीय ‘सरप्राईज’ मिळण्याची दाट शक्यता आहे. मोठमोठ्या नावांची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याविरोधात जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या नावाने आघाडी घेतली आहे. उमेदवारीसाठी तयारीला लागण्याची सूचना वरिष्ठ पातळीवरून करण्यात आल्याचे कोहळे यांनी मान्य केले आहे. आता अंतिम घोषणेची प्रतीक्षा आहे.

तिकीट देण्याची शक्यता

मतदारसंघातील ओबीसी मते लक्षात घेता भाजपकडून सुधाकर कोहळे यांना तिकीट देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ नेत्यांनी कोहळे यांना तयारीत राहण्याचीदेखील सूचना केली आहे. मात्र याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुजोरा दिला नाही. इतर इच्छुकांमध्ये कोहळे यांचेदेखील नाव आहे. मात्र अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समितीकडून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम नागपुरात कुणबी, हिंदी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती तसेच मुस्लिम समाजाचे मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. जातीय समीकरणात बसणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची या मतदारसंघाची परंपरा राहिली आहे. 2009, 2014 मध्ये येथून सुधाकरराव देशमुख निवडून आले होते. मात्र, 2019 मध्ये ठाकरे यांनी भाजपला धक्का दिला.

काँग्रेसकडून शहराध्यक्ष विकास ठाकरे त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेंद्र जिचकार यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजपकडून अद्यापही या मतदारसंघातील उमेदवाराबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर व उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी, नरेश बरडे, जयप्रकाश गुप्ता हे येथून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रगती पाटील, डॉ. परिणिता फुके, कल्पना ग्वालबंशी, डॉ. वैशाली चोपडे, अश्विनी जिचकार, वर्षा ठाकरे यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे. मात्र आता कोहळेंच्या नावामुळे या सर्वांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

Assembly Election : मलकापुरात आघाडीचं ठरलं..! महायुतीचं ठरेना ! 

इच्छुकांना धडकी

पश्चिम नागपूरमधून माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर माया इवनाते, नरेश बरडे, जयप्रकाश गुप्ता यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशात दयाशंकर तिवारी यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, भारतीय जनता युवा मोर्चाकडून माजी महापौर संदिप जोशी यांच्यासाठी आग्रह धरण्यात आला. या परिस्थितीत सुधाकर कोहळे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा विचार झाला असेल तर इच्छुकांचे स्वप्न भंगणार आहे, हे निश्चित.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!