महाराष्ट्र

Akola West : ठरलं! भाजपकडून हरीशभाईशी बोलणार.. 

Assembly Election : महायुती, महाविकास आघाडी दोन्हीसाठी अकोला ठरले डोकेदुखी 

Mahayuti & Mahavikas Aghadi : संपूर्ण विदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीसाठी सर्वाधिक डोकेदुखी निर्माण करणारा मतदारसंघ ठरला आहे अकोला पश्चिम. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपमध्ये बंडखोरीचे प्रमाण जास्त आहे. विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्व विरोधक एकवटले आहेत. त्यातच माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक ओळंबे हे पक्ष सोडून प्रहारमध्ये निघून गेले आहेत. याशिवाय अकोला महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती संजय बडवणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्वात अलीमचंदानी यांचा अर्ज भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

स्ट्रॉंग’ शिफारस..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी हरीश अलीमचंदानी यांच्या नावाची ‘स्ट्रॉंग’ शिफारस केली होती. परंतु या सर्व विरोधाला न जुमानता भाजपने विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिली. विजय अग्रवाल हे साम, दाम, दंड, भेद असं सगळं काही वापरून विजय मिळवू शकतात याची खात्री असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांने दिली. त्यामुळे प्रचंड विरोध होणार असल्याचे माहिती असताना सुद्धा भाजपनं अग्रवाल यांच्याच नावाची निवड केली, असंही या नेत्याने सांगितले. त्यामुळे आता बंडखोरी केलेल्या नेत्यांकडे भाजप वळणार आहे.

फोन की प्रत्यक्ष भेट? 

भाजपमधून बंडखोरी करणारी हरिष अलीमचंदानी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे बोलणार की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा फैसला झाला आहे. शुक्रवारी (1 नोव्हेंबर) फडणवीस आणि बावनकुळे हे दोन्ही नेते नागपुरात पोहोचले. लक्ष्मीपूजनाचा दिवस असतानाही या नेत्यांमध्ये निवडणूक आणि बंडखोर यांच्याबाबत चर्चा झाली. यात प्रामुख्याने विदर्भातील काही मतदारसंघांचा समावेश होता. मूर्तिजापूर आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोणी कोणाशी बोलायचं याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हरीश अलीमचंदानी यांची येता काही तासात समजूत काढण्यात येणार आहे.

Assembly Election : बंडखोर, अपक्ष उमेदवारांनी उडवली झोप

भाजपला ठाऊक

हरीश अलीमचंदानी हे स्वतः व्यापारी आहेत. राजकारण करताना त्यांच्या कोणत्याही अवास्तव अपेक्षा नाहीत, हे भाजपला ठाऊक आहे. अलीमचंदानी हे नाराज असले तरी ते कुठपर्यंत ताणू शकतात, याचा अंदाजही भाजपने घेतला आहे. हरीश अलीमचंदानी यांना बऱ्याच मर्यादा असल्याने त्यांची समजूत कशी काढायची हे भाजपकडून ठरलं आहे. विजय अग्रवाल हे विधानसभेत गेल्यास अकोला महानगरपालिकेतील महापौर पदावर हरीश अलीमचंदानी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. इतकेच नव्हे तर अकोल्यातील त्यांचा व्यवसाय आणि एकूणच व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची ‘दिवाळी बोनस ऑफर’ भाजपकडून अलीमचंदानी यांना दिले जाण्याची दाट शक्यता असल्याचे या नेत्याने संकेत दिले. त्यामुळे हरीशभाई यांच्या उमेदवारी अर्जाचा अडथळा दूर होईल असा विश्वास भाजपला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!