Akola Constituency : वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या वसंत मोरे यांनी अखेर अकोल्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन जाहीर प्रवेश केला आहे. आज सायंकाळी वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे हे अकोल्यात दाखल झाले. अकोल्यातल्या कृषीनगर भागातल्या प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी वसंत मोरेंनी वंचितमध्ये प्रवेश केला. आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी आज वंचितचा झेंडा हाती घेतला. याशिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.
Lok Sabha Election : वंचित सोबत चर्चेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत तयार
मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे हे मनसेमध्ये नाराज होते. अंतर्गत राजकारणावर त्यांनी सातत्याने भाष्य केलं होतं. परंतु त्यांनी कधीच राज ठाकरे यांच्यावरची निष्ठा ढळू दिलेली नव्हती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची देखील भेट घेतली होती.
त्यामुळे त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल, असं वाटत होतं. मात्र पुण्याची जागा काँग्रेसकडे असल्याने त्यांचा नाईलाज झाला. दरम्यान वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये पुणे लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा झाली आणि मोरेंची उमेदवारी वंचितने जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी वसंत मोरे यांनी वंचितमध्ये अधिकृत प्रवेश केला.
कोण आहेत वसंत मोरे!
कट्टर मनसे सैनिक म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरेंच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेंचं नाव अग्रेसर होतं. वसंत मोरे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1975 साली पुण्यात झाला. कात्रजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शाहू मंदिरमध्ये महाविद्यालयीनं शिक्षण पूर्ण केलं. ते एक व्यावसायिक असून शेतकरीही आहेत. वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते राज ठाकरेंप्रमाणेच आधीचे शिवसैनिक आहेत. गेली 27 वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तर 2006 साली मनसेच्या स्थापनेवेळी त्यांनी राज यांची साथ न सोडता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. वर्षभरातच म्हणजेच, 2007 साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं एकाच फटक्यात 8 नगरसेवक निवडून आणले. मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता. मोरेंनी यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही.
आंबेडकर हेच विजयी होणार असा दावा देखील करण्यात आला आहे. या पोस्टमुळे अकोल्यात आगामी काळात राजकारण चांगलंच तापणार आहे.
काँग्रेस कडून आंबेडकर यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला जात आहे परंतु वंचित मात्र वेगळीच मानसिकता बाळगलेला दिसते. असे कुठवर चालणार ही चर्चा मतदारसंघात रंगताना दिसते