महाराष्ट्र

Mumbai : विधानसभा अध्यक्षांना दंड ठोठावणाऱ्या न्यायधीशांची बदली

Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात मुद्दा गाजण्याची शक्यता

मुंबई येथील सत्र न्यायालयात कार्यरत असलेले विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली झाल्यानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे. रोकडे यांच्या न्यायालयात अनेक हाय प्रोफाइल प्रकरण सुरू होते.  न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नुकतंच एका सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका प्रकरणात 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. रोकडे अनेक सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांविरोधातील खटल्यांचे न्यायाधीश होते.

शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन, भोसरी भूखंड घोटाळा या प्रकरणाचे खटले रोकडे यांच्या काळात अंतिम टप्प्यात होते. असे असताना त्यांची बदली करण्यात आली आहे. या बदली नंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. 1 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. यानंतर विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांत होऊ शकते. दुसरीकडे मुंबई येथील सत्र न्यायालयात न्यायाधीश असलेले राहुल रोकडे यांच्या बदली वरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या न्यायालयात हाय प्रोफाइल प्रकरण सुरू होते. त्यांची अचानक बदली झाल्याने पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

न्यायाधीश राहुल रोकडे हे राज्यभर गाजलेल्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी 12 जुलैला सुनावणी घेणार होते. याच दरम्यान रोकडे यांची दिंडोशी येथील सत्र न्यायालयात बदली झाली आहे. रोकडे यांच्या न्यायालयात राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना वॉरंटचा इशाराही दिला होता. विशेष म्हणजे शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी अजित पवारांना क्लिन चिट दिली आहे. पण त्याविरोधात ईडीने कोर्टात धाव घेतली आहे. याच प्रकरणी आता येत्या 12 जुलैला सुनावणी होणार होती. पण त्याआधीच न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे.

नार्वेकर यांना ठोठावला होता दंड

सध्या विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना दंड ठोठावण्यात आल्याचं प्रकरण न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या बदली नंतर चर्चेत आले आहे.  महाविकास आघाडी सरकार असताना वीजदरवाढीविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरु होता. या खटल्यात 20 पदाधिकाऱ्यांमध्ये राहुल नार्वेकर यांचंही नाव होतं. पण राहुल नार्वेकर या प्रकरणाच्या सुनावणीत सातत्याने गैरहजर राहिल्याने त्यांना न्यायाधीशांनी 3 हजारांचा दंड ठोठावला होता.

वडेट्टीवार यांची टीका

सत्तेत आल्यानंतर सर्व काही बंद होईल असं होतं. मात्र अजित पवार यांची उपयुक्तता कमी झाली की काय म्हणूनच भाजप त्यांना पुढच्या विधानसभा निवडणुकीत घेऊ इच्छित नसेल. म्हणून कदाचित त्यांना अडकविण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न पुन्हा नव्याने काही करायचे षडयंत्र असू शकते. त्यामुळे या बदलीचा आणि याचा काही अर्थ जोडण्यास अर्थ नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मिटकरींनी दिले प्रत्युत्तर

विजय वडेट्टीवार यांच्या टिकेनंतर आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचं दुटप्पी धोरण असल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेसची संविधान विरोधी भूमिका सुरुवातीपासून दुटप्पी राहिली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!