महाराष्ट्र

Bhandara : भंडारा जिल्ह्यात डीजे व्यावसायिकाच्या आत्महत्येने उठले वादळ ! 

DJ : सोशल मिडियातून माजी आमदाराच्या सुकुटुंबीयांवर संशयाची सुई ! 

Bhandara : भंडारा जिल्ह्यात पुन्हा एक राजकीय वादळ उठले आहे. जिल्ह्यातील एका डीजे व्यावसायिकाने आत्महत्या गेली. त्यानंतर त्याने आत्महत्या का केली, याबाबतची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्या पोस्टमध्ये जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात आहे. आता या आत्महत्येला राजकीय वळण लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध चर्चांना ऊत आला आहे. 

आंधळगांव पोलिस स्टेशन हद्दीत एका डीजे व्यावसायिकाने गळफास लावला. ही घटना रविवारी (20 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास घडली. याची माहिती आंधळगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पंचनामा सुरू केला. मृतकाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गावातील एका मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध तसेच त्याच्यावर असलेले खाजगी फायनान्सच्या कर्जाचा डोंगर. या तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, असे फिर्यादी मृतकाच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले.

वडीलांच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिस स्टेशन येथे कलम 194 अन्वये मर्ग दाखल केला आहे. आता ही घटना इथपर्यंत ठीक होती. मात्र दुसऱ्या दिवशी याचा थेट संबंध तुमसरचे माजी आमदार आणि शरद पवार गटाचे नेते चरण वाघमारे यांच्या कुटुंबाशी जोडला गेला. तशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागल्या.

Assembly Election : बोले तैसा न चाले… म्हणे आमचे व्हावे भले!

सोशल मीडियावर पोस्ट वायरल

निवडणूक तोंडावर आली आहे. आपली व आपल्या कुटुंबाची नाहक होत असलेली बदनामी लक्षात घेत चरण वाघमारे यांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची तक्रार दिली आहे. तसेच पोलिसांनी स्वतः याची चौकशी करावी, अशी मागणीही वाघमारे यांनी केली आहे. व्हायरल पोस्ट बघून चरण वाघमारे स्वतः पोलिसात तक्रार करायला गेले. त्यामुळे साहजिकच या प्रकरणाला राजकीय वलय प्राप्त झाले. झाले ही तसेच जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या संदर्भात ‘द लोकहीत’ने माजी आमदार चरण वाघमारे यांचे मत जाणून घेतले असता, ते म्हणाले की, निवडणूक बघून मला व माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. माझ्या कुटुंबाच्या विरोधात अशी कुठलीही तक्रार मृतकाच्या कुटुंबाने केलेली नाही. माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा जो प्रकार सुरू झाला आहे, ते कदापिही सहन करणार नाही. म्हणून याची रीतसर तक्रार आंधळगाव पोलिस स्टेशनमध्ये केली आहे.

वाघमारे यांच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार?

स्वतः चरण वाघमारे यांनी आंधळगाव पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असल्याचे सांगितले जात आहे. स्वतः वाघमारे पोलिसांना सहकार्य करत असल्याचे चित्र सध्या आहे. या सर्व घडामोडींमागे 2019च्या निवडणुकीत वाघमारे यांच्या विरोधात झालेली तुमसर पोलिसातील तक्रार आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक अधिक चर्चेत आली होती. आता पुन्हा निवडणुक तोंडावर असताना वाघमारे यांच्यामागे पोलिस तपासाचा ससेमिरा सुरू झाला. एकीकडे स्वतःच्या राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षात वाघमारे यांच्या विरोधात एक फळी सक्रीय झाली आहे. प्रकरण काहीही असो, पण चरण वाघमारेंना या प्रकरणात जास्त गुंतणे नुकसान करू शकते, हे मात्र निश्चित.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!