महाराष्ट्र

Pratibha Dhanorkar : प्रदेशाध्यक्षांनी धानोरकरांना दिली समज

Nana patole : खासदार तिकीट वाटत नसतात

Politics Of Chandrapur : चंद्रपुरातील आमदाराला मंत्रीपद मिळावं, यासाठी प्रयत्न करणार असल्याची मोठी घोषणा खासदार धानोरकर यांनी केली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येत असलेल्या विधानसभा मतदारसंघात आता मी तिकीटं वाटणार असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुनावले आहे.

आज (ता. 13) नागपुरात नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खासदार तिकीट वाटतील, असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. कारण तिकीट हायकमांड वाटत असतात. खासदार शिफारस करू शकतात, आपली मतं मांडू शकतात. पण तिकीट वाटत नाहीत. काँग्रेस पक्षात लोकशाही आहे. निवडणुकीत नुकसान – फायदा हा नंतरचा भाग आहे. लोकशाहीने पक्ष चालला पाहिजे, हे महत्वाचे आहे.

Oath Ceremony : ईशान्येत भाजपची वाट सुकर करणारे खांडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी

सुभाष धोटे यांना सुपारी देण्यात आली का?

मला लोकसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी आमच्याच पक्षातील काही लोकांनी प्रयत्न केले. त्यासाठी आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्यात आली होती, हे सांगताना खासदार प्रतिभा धानोरकर त्यांचा रोख विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे, याबाबत विचारले असता, याबाबत त्या काय बोलल्या, हे माहिती नाही, असे नाना पटोले म्हणाले.

सुभाष धोटे कुठल्याही भुलथापांना बळी पडले नाहीत. नैसर्गिक न्यायासोबत ते राहिले. अगदी सुरुवातीपासून ते माझ्यासोबत होते. ज्याचा नैसर्गिक हक्क आहे, त्याच्यासोबत मी राहील, असे म्हणत त्यांनी योग्य भूमिका घेतली. त्याचाच परिणाम म्हणजे हा विजय आहे, असे खासदार धानोरकर म्हणाल्या.

आमच्याच पक्षातील काही लोकांनी आमदार धोटे यांना पैसे देऊन मॅनेज करण्याचेसुद्धा प्रयत्न केले. पण त्यांनी कुठलीही लालसा ठेवली नाही. कुणाच्या खोट्या आश्वासनाला विकले गेले नाहीत. पक्षातील प्रत्येक जण आमदार धोटेंसारखा अ्सला, तर पक्षाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्देवाने आमच्या पक्षात आपल्याच उमेदवाराला पाडण्यासाठी कटकारस्थाने रचतात, असा गंभीर आरोप खासदार धानोरकर यांनी पुन्हा नाव न घेता केला होता. याबाबत काही माहिती नाही, असे नाना पटोले म्हणाले. पण ‘मी तिकीटं वाटणार…’, या धानोरकरांच्या वक्तव्याचा मात्र नानांनी समाचार घेतला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!