महाराष्ट्र

Lok Sabha Election : निवडणुकीमुळे लालपरी झाली मालामाल !

Economic Support : आर्थिक परिस्थिती खालावत चाललेल्या महामंडळास लाखोंचा हातभार

ST Bus : लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने वाहनांची जुळवाजुळव केली. मतदान यंत्रे, कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी प्रासंगिक करारावर जिल्ह्यात 270 बसगाड्यांची मागणी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस बुक करण्यात आल्या. यामुळे आर्थिक परिस्थिती खालावत चाललेल्या महामंडळास लाखोंचा हातभार लागला आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले. मतदान पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत 25 एप्रिल रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. नंतर त्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातही आगारांमधून 270 बसची व्यवस्था करण्यात आली होती. या बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यापोटी महामंडळाला शासनाकडून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे.

बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य ने-आण करणे, कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील सातही आगारांच्या बसची संख्या कमी पडत असल्याने परजिल्ह्यातील बसेस मागविण्यात आल्या होत्या.

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत पाठविण्यासाठी 270 बस 25 आणि 26 एप्रिलपर्यंत राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन दिवस जिल्हांतर्गत वाहतूक प्रभावित झाली होती. दरम्यान, निवडणूक आटोपताच सर्वच आगारांमधून बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातही आगाराला यामुळे बऱ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले. त्यामुळे एसटी मालामाल झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.

Lok shabha Elections : ‘हॅलो… मी उमेदवार बोलतो…’

या आगारातून बसेसची व्यवस्था

मतदान पथकांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी बुलढाणा, मेहकर, जळगाव जामोद, चिखली, मलकापूर आणि खामगाव या सहा आगारांमधून बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.

दोन दिवस प्रवाशांची गैरसोय

मतदानासाठी बुलढाणा जिल्ह्यातील पाचही आगारांतील तसेच इतर जिल्ह्यांतील बसेस मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हांतर्गत व आंतर जिल्हा बस सेवाही 25 व 26 एप्रिल रोजी प्रभावित झाली होती. मात्र त्यानंतर एसटीच्या फेऱ्या सुरळीत झाल्या. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सहाही विधानसभा मतदारसंघात 270 एसटी बसेसशिवाय इतर खासगी वाहनेही तैनात करण्यात आली होती. स्कूल बसेसचा समावेश आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!