महाराष्ट्र

MLA Sanjay Gaikwad : ..शिंदे गटाच्या आमदाराने वाचला महायुतीच्या चुकांचा पाढा

Buldhana News : पराभवाच्या जखमेवर चोळले मीठ

MLA Sanjay Gaiwad : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा आणि महायुतीला मिळालेले अपयश हे जिव्हारी लागलेलं असतानाच थेट महायुतीमधील एका आमदाराच्या विधानाची चर्चा आहे. शिंदे गटातील आमदाराने महायुतीकडून देण्यात आलेले चुकीचे उमेदवार, आयात उमेदवार यामुळेच पराभव झाल्याचे विधान करून महायुतीच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत चांगलीच धुसफुस दिसून येत आहे. बुलढाण्यात पत्रकारांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी महायुतीच्या चुकांचा पाढाच वाचला. वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्धी झोतात राहणारे शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, वंचितच्या उमेदवारांनी मागच्या वेळेस पावणेदोन लाख मते घेतली होती. यावेळेस तेवढी मते त्यांनी घेतली नाही, दुसरं म्हणजे अपक्ष उमेदवारांनीही महायुतीच्या मतांचे लचके तोडले. त्यामुळे यावेळी मतांची लीड कमी झाली. या निवडणुकीमध्ये उबाठा गटाचे मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले मात्र शिंदे गटाचे त्या तुलनेत मतदानासाठी कमी बाहेर पडले. यामुळे हा मतांचा फरक आलेला आहे, असे ते म्हणाले.

राज्यामध्ये 45 पार चा नारा महायुतीने दिला होता तो पूर्ण होताना दिसत नाही असे विचारले असता आमदार गायकवाड म्हणाले की, चुकीच्या पद्धतीने उमेदवार दिल्या गेलेत, महादेव जानकर कुठून कुठे गेले, हिंगोलीचे उमेदवार वाशिमला दिले. कसे काय अशा गोष्टी जमणार कसे लोक स्वीकारतील? रावसाहेब दानवे सहा वेळा मंत्री झाले आहेत. भारती पवार मंत्री असल्यामुळे जनतेत पोहोचू शकल्या नाहीत त्यामुळेच अनेक ठिकाणी पराभव झाले असे त्यांनी सांगितले.

Lok Sabha Result : जब तक हैं दम, लढेंगे हम

निकालापूर्वीही दिले होते गायकवाडांनी संकेत

आमदार संजय गायकवाड यांनी निकालापूर्वी महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसणार असल्याची कबुली दिली होती. ते म्हणाले होते की, एक्झिट पोलचा परिणाम बऱ्यापैकी खरा असतो आणि या पोलचा निष्कर्ष जवळपास खरे देखील ठरतात. हे अंदाज लक्षात घेता असे वाटते की, राज्यात महायुतीला अँटी इन्कबन्सीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार. अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे होती. जनतेला खासदाराची कामे कदाचित माहीत नाही. त्यामुळे गैरसमजातून अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणचे उमेदवार आणि रिपीटेशनमुळेही महायुतीला फटका बसला असल्याचेही संजय गायकवाड म्हणाले. तर रावसाहेब दानवे, प्रतापराव जाधव यांची जास्त टर्म झाल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती.

error: Content is protected !!