महाराष्ट्र

Congress : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सत्तेवर येणार

Ramesh Chennithala : महायुतीला बहीण नव्हे सत्ता लाडकी

Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला धडा शिकवला आहे. विधासभा निवडणुकीत महाविकास आघाडी बहुमताने विजयी होईल. महाविकास आघाडीचेच सरकार बनेल, असा विश्वास काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. चेन्नीथला राज्यातील वरिष्ठ नेत्यांसह विदर्भ दौऱ्यावर आहेत. ते विधानसभा निवडणुकीसाठी तयारीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी (ता. 13) त्यांनी बुलढाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. देशात सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. पण महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. शेतमालाला एमएसपी नाही. डॉ. मनमोहन सिंह सरकारने शेतकऱ्यांचे 72 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. पण भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, वाशिम जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमित झनक, अकोला काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर, अकोला शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे, आमदार राजेश एकडे, आमदार धीरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, संजय राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, आदी यावेळी उपस्थित होते.

वक्फ सुधारणेला विरोध

रमेश चेन्नीथला म्हणाले की, केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक आणले. हे विधेयक अल्पसंख्याक समाजाच्या हिताचे नाही. वक्फ सुधारणा विधेयक अल्पसंख्यांकांच्या विरोधात आहे. सरकारने कोणाशीही चर्चा न करता हे विधेयक आणले आहे. अल्पंसख्यांकांच्या भावनांचा विचार न करता ही सुधारणा होत आहे. मुस्लिम समाजाचा विरोध असतानाही हे विधेयक आणले गेले आहे. लोकसभेत या विधेयकाला विरोध होत आहे. त्यामुळे संयुक्त संसदीय समितीकडै पाठवावे लागले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच जनतेचे प्रतिसाद दिला. विधानसभा निवडणुकीतही हा प्रतिसाद कायम राहणार आहे.

Assembly Election : विदर्भात भाजप, काँग्रेसला शोधावे लागणार सहा चेहरे

केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या विरोधातही जनतेत प्रचंड रोष आहे. अनेकांना नोटीस देण्यात येत आहे. सरकार भ्रष्ट मार्गाने सुरू आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. अंमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. महायुती सरकार जनतेसाठी नाही, तर सत्तेसाठी काम करत आहे. सरकारला बहिण नाही, तर सत्ता लाडकी आहे. वडेट्टीवार म्हणाले की, महायुती लुटारुंची टोळी आहे. तिजोरीत पैसे नसताना पाच लाख कोटींचे कर्ज काढण्यात आले. टेंडरची कामे काढली गेली आहेत. समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचे 900 कोटींचे टेंडर काढले. ते रद्द करून नंतर 1 हजार 800 कोटी रुपयांचे केले गेले. मुंबईतील 10 लाख कोटींच्या जागा अदानीच्या घशात घालण्यात आल्या.

राज्यातील तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. पण महायुती सरकार नोकरभरती करत नाही. एमपीएससीच्या जागा भरल्या जात नाहीत. सरकार 75 हजार जागा भरणार होते. त्या भरल्या गेलेल्या नाहीत. अदानीचे घर मात्र भरले जात आहे. लोकसभेत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरी बसू नये. बाहेर पडावे. जनतेमध्ये जावे. त्यांची कामे करावी. काँग्रेसच्या विचाराची सत्ता राज्यात आली पाहिजे, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे असे सतेज पाटील म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!