महाराष्ट्र

Congress : देशमुखांची ‘डायरी’ हरवली… ती कुणाला सापडली?

Anil Deshmukh : ‘होम मिनिस्टर’च्या पुस्तकाचा निवडणुकीत किती प्रभाव?

Diary of a Home Minister : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ने निवडणुकीपूर्वी खूप माहोल केला. पण आता ही ‘डायरी’ कुठे हरवली आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच डायरीची उत्सुकता निर्माण केली गेली. त्यामुळे निकालावर त्याचा नक्कीच परिणाम होईल, असे वाटले होते. पण, उलट देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने दणक्यात कामगिरी केली. त्यामुळे या डायरीचा कुठलाही प्रभाव मतदारांवर पडला नाही, असेही बोलले जात आहे.

श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेत देशमुख-फडणवीस वादाला फोडणी दिली होती. त्यानंतर स्वतः अनिल देशमुख यांनी मैदानात येत थेट फडणवीस यांच्यावर आरोप केले. आणि सविस्तर विषय माझ्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात मांडले आहे, असेही सांगितले. त्यामुळे या पुस्तकात काय असेल, याबाबत कमालीची उत्सुकता होती. निवडणूक जवळ येत गेली तसतसे देशमुख डायरीतील एक एक धडा सोशल मीडियावर पोस्ट करत गेले. त्यात अनेक गंभीर आरोप होते. तर काही आरोपांचा पुनरुच्चार होता.

कारागृहातील उंदराला ‘टरबुज्या’ म्हणणे असो किंवा फडणवीसांनी दबाव टाकणे असो, असे अनेक आरोप यात होते. देशमुखांच्या प्रत्येक पोस्टवर बातम्या होत होत्या. माध्यमांवर चर्चा झाली. राजकीय वर्तुळासाठी एक मनोरंजनाचा भागही ठरला. पण, त्याचवेळी फडणवीस यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांचे नेतृत्व महाराष्ट्र अमान्य करेल, त्यांचा विजय धोक्यात येईल, असा विश्वास कदाचित अनिल देशमुखांना असावा. मात्र तसे काहीही घडले नाही. कारागृहात मिळालेल्या फावल्या वेळात देशमुख यांनी डायरी लिहून काढली असावी. तेथे 14 महिने त्यांच्याकडे भरपूर वेळ होता, असे टोमणे भाजपची नेते मंडळी मारत होते.

काटोलमधील वर्चस्व धोक्यात

दरम्यान, देशमुख यांनी मात्र 14 महिन्यांच्या कारागृहातील वेदना डायरीमध्ये मांडल्या आहेत. त्यातून लोकांना फडणवीस आणि भाजप सरकारचे कारनामे कळतील, असा दावा केला होता. एवढेच नव्हे तर आता अनिल देशमुख फडणवीसांच्या विरोधात दक्षिण-पश्चिम नागपूरमधून लढू शकतात, असेही बोलले जाऊ लागले. राष्ट्रवादीच्याच (शरद पवार गट) नेत्यांनी तशी वक्तव्ये केली. पण, देशमुखांना मुलगा सलीलच्या हट्टामुळे ऐनवेळी काटोलही सोडावे लागले. भाजपचे चरणसिंग ठाकूर निवडून आल्यामुळे काटोलमधील देशमुखांचे वर्चस्वही धोक्यात आले. अशात अनिल देशमुखांची ‘डायरी’ कुठे हरवली, याची चर्चा होऊ लागली आहे.

Mahayuti 2.0 : सारे कसे दणक्यात अन् गाजत वाजत

दगडफेकीवरही संशय

प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. देशमुख पिता-पुत्रांनी भाजपनेच दगडफेक केली असल्याचा आरोप केला. पण, भाजपच्या नेते मंडळींनी मात्र ही दगडफेकच बनावट असल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे त्या घटनेतूनही काटोलच्या मतदानावर फारसा काही परिणाम झाला नाही, असे दिसते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!