Youth : तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांचा कल महत्वाचा ठरला. त्यामुळे आता या वर्गाला खुश करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरु झाले आहेत. अशात बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारने बेरोजगारी भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी नितीश मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू-भाजप सरकारने तरुणांचे हित लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील मनरेगा अंतर्गत बिहार बेरोजगार भत्ता नियम 2024 ला मंजुरी दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषदेची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
बिहार बेरोजगार भत्ता नियम 2024 मंजूर करताना, बिहार सरकारने निर्णय घेतला आहे की बिहारमधील बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता दिला जाईल. बेरोजगारीसाठी अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांत अर्जदाराला रोजगार मिळाला नाही, तर राज्य सरकार मागणी केल्याच्या तारखेपासून विहित मर्यादेत नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीला रोजचा बेरोजगारी भत्ता देईल. मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली
या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 25 अजेंडा मंजूर करण्यात आले आहेत. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ शकतात. अशा परिस्थितीत बिहारच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून नितीश कुमार यांचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.दरवर्षी बिहारमधील लाखो विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आहेत.परंतू बिहारमध्ये त्यांच्यासाठी रोजगाराचे कोणतेही चांगले पर्याय उपलब्ध नाहीत. या सर्व गोष्टीच्या विचार करून हा निर्णय घेण्यात आला.28 जानेवारी 2024 रोजी पाटणा येथील राजभवनात नवीन राज्य सरकारच्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.