महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : उमेदवारांबाबतची आघाडी कायम राहणार?

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीची चवथी यादीही जाहीर

Assembly Election : लोकसभा निवडणुकीच्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सध्या सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने पुन्हा काही उमेदवारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत 67 उमेदवार ‘वंचित’कडून जाहीर करण्यात आले आहेत. चवथी यादी जाहीर करण्यात आली आहे. ‘वंचित’ने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. मात्र निवडणुकीत ही आघाडी कायम राहिल का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.

 निवडणूक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आता 10 दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घामासन सुरू आहे. अशात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर करण्यामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे.

एका पाठोपाठ यादी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 19 ऑक्टोबर रोजी 16 जणांची चौथी यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात ‘वंचित’ने आपला उमेदवार जाहीर केला आहे. कराड दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीकडून संजय कोंडीबा गाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीकडून चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. चारही याद्यांमधून 67 उमेदवारांची घोषणा ‘वंचित’ने केली आहे.

निवडणुकीत ‘वंचित’ आघाडी घेईल का? अशी चर्चा कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला मोठा फटका बसला होता. मतांमध्येही मोठी घट झाली होती. ‘वंचित’कडून अद्यापही आघाडी किंवा युतीबाबत शक्यता कमीच असल्याचं बोललं जातं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’चा एकही उमेदवार निवडून आला नाही. ‘वंचित’चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024 मधील लोकसभा निवडणुकीत मतांमध्येही मोठी घसरण झाली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘वंचित’ची महाविकास आघाडीसोबत आघाडी होईल अशी चर्चा सुरू होती. मात्र अखेरीस वंचितने स्वबळाचा नारा देत लोकसभा निवडणुक लढवली. या निवडणुकीत मोठा फटका ‘वंचित’ला बसला. आता पुन्हा एकदा ‘वंचित’ने विधानसभा स्वबळाच्या दृष्टीने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा या निवडणुकीसाठी वंचितकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कशी कामगिरी करतात, याकडे लक्ष असेल.

Prakash Ambedkar : अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का?

288 जागांवर मतदान

20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशात चौथ्या यादीमध्ये शहादा, साखरी, तुमसर अर्जुनी मोरगाव, हदगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदारसंघांमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!