महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : विदर्भ- मराठवाड्यात घडणार नवी दुधक्रांती

Milk Projects : राज्यातील 19 जिल्ह्यात राबविला जाणार दुग्घ विकास प्रकल्प

Mahayuti Government Announcement : मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने मंगळवारी (ता. 13) महत्वाचा निर्णय घेतला. पशुपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 149.26 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. यापूर्वी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा राबविण्यात आला. त्यात केवळ 11 जिल्ह्यांचा समावेश होता. आता यात आणखी आठ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

शेकऱ्यांना उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी, म्हशीचे वाटप केले जाईल. उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचेही अनुदान तत्वावर वितरण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाडा आणि विदर्भात नवी दुधक्रांती घडेल. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) आणि मदर डेअरीच्या सहकार्याने राबविला जाणार आहे.

शेतकऱ्यांना सुविधा

प्रकल्पात उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी-म्हशींचे वाटप, केले जाईल. गायी म्हशींमधील वंध्यत्व निवारण करण्यात येईल. उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे वाटप होईल. पशु प्रजननपूरक खाद्यांचा पुरवठा करण्यात येईल. दुधातील फॅट व एसएनएफवर्धक खाद्य पुरकांचा पुरवठा होणार आहे. चारा-पिके घेण्यासाठी अनुदान मिळेल. विद्यूत चलित कडबाकुट्टी सयंत्र मिळणार आहे. मुरघासासाठी अनुदानही प्रदान करण्यात येणार आहे. आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण अशा एकूण नऊ घटकांचा समावेश असेल.

Assembly Election : विदर्भात भाजप, काँग्रेसला शोधावे लागणार सहा चेहरे

दुसऱ्या टप्प्यातील या प्रकल्पात विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम यांचा समावेश असेल. मराठवाड्यातील नांदेड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांनाही प्रकल्पाचा लाभ मिळेल. प्रकल्पासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी 149.26 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नागपूर येथे मदर डेअरीच्या माध्यमातून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत 500 कोटी रूपये खर्चाचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागाच्या विकासाला चालना मिळेल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील या प्रकल्पामुळे उपलब्ध होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!