Crop Insurance : पीक विम्याबाबत शेतक-यांच्या तक्रारींची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूरात आणि त्यानंतर लगेच 7 ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठक घेतली. याबैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. त्यानंतर शनिवारी, 10 ऑगस्ट रोजी पुन्हा चंद्रपूर येथे पीक विमा योजनेची मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. इतक्या कमी वेळात शेतकऱ्यांना न्याय देण्यात सुधीर मुनगंटीवार यशस्वी झाले आहेत. मंत्री मुनगंटीवार यांचा प्रशासनातील दीर्घ अभ्यासाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला.
प्रधानमंत्री पीक विमा योजना या संवेदनशील विषयावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाची अतिशय तत्परता जाणवली. जिल्हाधिका-यांनी वारंवार या गोष्टींचा पाठपुरावा करून संबंधित विभागाचा आढावा घेतला आणि सुचना केल्या. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले. याबद्दल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपयांचे क्लेम आहेत. यात 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचा समावेश आहे. यांपैकी 86,657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली आहे. कंपनीकडून उर्वरीत 63 कोटी रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शासनाच्यावतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येणार असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे 3 लक्ष 46 हजार अर्ज
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी केवळ 62 हजार शेतक-यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र गतवर्षी 1 लक्ष 84 260 शेतक-यांचे 3 लक्ष 41 हजार 233 अर्ज आले. तर यावर्षी आतापर्यंत 1 लक्ष 79 हजार 443 शेतक-यांचे 3 लक्ष 46 हजार 692 अर्ज आले आहेत.
Sudhir Mungantiwar : इतिहासात कधी नव्हे, येवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार विमा !
लवकरच पिक विमा
मंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उर्वरित 46,500 शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीकविम्याचा क्लेम मिळाला नाही . अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या लाभ होणार आहे. उर्वरित 46500 शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण 56 कोटी रुपये मिळणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामूळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दरवर्षी पेक्षा सर्वाधिक पीक विमा रक्कम या वर्षी मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार..
सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व विशेष प्रयत्नाने ही पीक विम्याची रक्कम शेतकर्यांना मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.