प्रशासन

Assembly Election : हिरवी मिरची, चॉकलेट, नेल कटर अन् पॅन्ट!

Buldhana : आयोगाकडून काही पारंपरिक, तर काही मजेशीर चिन्हे

Election Symbols : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी 190 निवडणूक चिन्हे जाहीर केली आहेत. काही चिन्हे पारंपरिक, काही बदलत्या काळाला अनुसरून, तर काही अगदीच मजेशीर अशीच आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवाराला एबी फॉर्म मिळाल्यानंतर कमळ, पंजा, हत्ती, विळा, हातोडा, तारा, पुस्तक, ट्रेन, झाडू, धनुष्यबान, मशाल, घड्याळ व तुतारी या 11 चिन्हांचे वाटप केले जाईल. मजेची बाब म्हणजे, अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 190 चिन्हे निवडणूक आयोगाने तयार ठेवली आहेत. ती मजेशीर अशीच आहे. त्यात पंच मशीन, टॉर्च, खाट, टेबल, पेंचीस, दुर्बीण, आलमारी, बंदूक, गॅस सिलेंडर, जहाज, झुला, स्विच बटण, चाळणी, टिफिन, ऑटो, सेब, रेडिओ, इस्त्री, ब्रश, शार्पणर, रिंग, चप्पल, लिफाफा, चम्मच, कढई, पाना, पतंग, काठी, पर्स, कुकर व अशीच अनेक चिन्हे आहेत.

हिरवी मिरची, पोळपाट, टूथपेस्ट, पॅन्ट, फणस, फ्लॉवर, कोल्हापुरी चप्पल, उड्या मारण्याची दोरी, कॅरम, स्वीच बोर्ड, लोकर व सुई, पक्कड, ड्रील मशीन ही घरातील साहित्यांची यादी वाटत असेल तर जरा थांबा. या दैनंदिन गरजेच्या वस्तू कितीही महाग झाल्या असल्या तरी निवडणूक आयोगाने मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांसाठी 190 मुक्त चिन्हे जाहीर केली आहेत. 4 नोव्हेंबरला चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यातील बरीचशी चिन्हे मजेशीर आहेत. काही चिन्हे अशी आहेत की, ती मिळालेल्या उमेदवाराची प्रचार करताना कसरत होणार आहे.

पक्षांसाठी लागली यादी 

विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना जाहीर झाली. त्यानंतर निवडणूक विभागाने विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यात येणाऱ्या संतपीठ येथील प्रशासकीय इमारतीच्या निवडणूक कार्यालयाबाहेर राष्ट्रीय पक्षांचे राखीव चिन्ह व अपक्ष उमेदवारांसाठीच्या मुक्त चिन्हांची मोठी यादी लावली आहे. यातील बरीचशी चिन्हे मजेशीर आहेत. काही चिन्हे अशी आहेत की, ती मिळालेल्या उमेदवाराचा प्रचार करताना कसरत होणार आहे. ती चिन्हे पाहत अनेक जण त्या ठिकाणी थांबून उत्सुकतेने पाहताना दिसतात. तसेच, त्यावर चर्चा करताना नागरिक दिसत आहेत.

Buldhana : उद्धव ठाकरेंच्या बुलढाणा जिल्ह्यात दोन सभा

अशी आहेत चिन्हे…

दागिने, कपडे, कानातले, नेकलेस, बांगड्या, अंगठी, कोट, बूट, कोल्हापुरी चप्पल, बेल्ट आदी. दाढी करण्याचे ब्लेड, पंचिंग मशीन, स्वीच बोर्ड, खिडकी, कपडे अडकविण्यासाठी भिंतीची पट्टी, स्कूल बॅग, उशी, किचनमधील सिंक, करवत, हातगाडी, विटा, खाट. • सफरचंद, फणस, अक्रोड, कलिंगड, फ्लॉवर, ढब्बू मिरची, हिरवी मिरची, फळांची टोपली, मटर, भुईमूग, केक, द्राक्षे, चॉकलेट, आलं, भेंडी, पाव. कचरापेटी, जेवणाचा डबा, सेफ्टी पिन, नेल कटर, टूथपेस्ट, ब्रश, कात्री, पेट्रोलपंप, पाणी गरम करायचे रॉड, लायटर, कड़ी, पेन स्टॅन्ड, टाय, नुडल्सचे वाडगे, दरवाजाची कडी, फ्रीज, टी.व्ही., लॅपटॉप, वॉशिंग मशीन, जातं, पोळ पाट, बेलन, टोस्टर.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!