महाराष्ट्र

Lok Sabha Election : बुलढाणा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार मतमोजणी

EVM Strong Room : ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित !

Lok Sabha Counting : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान झाले. त्यानंतर सर्व 1962 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन्स बुलढाणा शहरातील आयटीआय मधील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूमला चार जूनपर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. करण्यात आलीय. ईव्हीएम आणि परिसरात नजर ठेवण्यासाठी 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

मतमोजणी बुलडाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 जूनला होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. याची सर्व उमेदवार, प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

तीन टप्प्यात सुरक्षा कवच

या स्ट्रॉंग रुमला तीन टप्प्यात सुरक्षा व्यवस्था आहे. पहिल्या गेटवर महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त, दुसऱ्या गेटवर एसआरपीएफची तुकडी सज्ज असून तिसऱ्या गेटवर केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांचा पहारा आहे. यासोबतच ईव्हीएम मशीन असणाऱ्या स्ट्रॉंग रूम परिसरात उपविभागीय अधिकारी,तहसीलदार दर्जाचे दोन अधिकारी रोज भेट देत आहेत.

Lok Sabha Election : या क्षेत्रातील 13 मे रोजीचा आठवडी बाजार रद्द !

100 वर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

आयटीआय इमारतीमधील स्ट्रॉंग रूममध्ये असणाऱ्या ईव्हीएम आणि परिसरात नजर ठेवण्यासाठी 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

बुलढाणा मतदारसंघात 62.53 टक्के मतदान झाले. येथे शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतापराव जाधव यांची लढत ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्याशी आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!