Lok Sabha Election : बुलढाणा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उम्मेदवाराला टेन्शन देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले मात्र हे चिन्ह अजूनही गाव खेड्या पर्यंत पोहोचले नाही हि बाबा प्रचारात समोर आली असून खुद्द उम्मेदवार नरेंद्र खेडेकर यांनी हि याबाबत स्पष्ट कबुली दिली आहे.
शिवसेना हा पक्ष फुटल्यानंतर 40 आमदारासह भाजपासोबत युती करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह तसेच मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला आता लोकसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या चिन्हा ऐवजी मशाल या चिन्हाचा वापर करावा लागत आहे. शिवसेना म्हटली म्हणजे धनुष्यबाण आणि हीच बाब सामान्य जनता तसेच पदाधिका आणि कार्यकर्ते यांच्या मनात कायमस्वरूपी रुजली असल्याने मतदारांमध्ये सध्या संभ्रम निर्माण होत आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेनवीन चिन्ह मशाल हे मतदारांना पोहोचून त्यांची माहिती देण्याकरिता खूप परिश्रम घ्यावे लागत असून अजूनही तळागाळातील मतदारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे चिन्ह माहित नसल्याचा खुलासा खुद्द बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे. यावेळी त्यांच्यावर चंपाचं मोठं टेन्शन असलयाचे दिसून आले.
Lok Sabha Election : भावना गवळी यांच्या पाठिशी उभा राहिला हा खमक्या नेता
धनुष्यबाण शिवाय ठाकरेंची पहिली निवडणूक
धनुष्यबाण आणि शिवसेनेचे अतूट नाते ही बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची तशीओळखही… गेल्या 35 वर्षांत शिवसेनेच्या याच चिन्हापुढे अनेक प्रस्थापित विरोधकांची शिकार झाली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हे चिन्ह गमावल्याने आता शिवसैनिकांना ‘मशाल’ हाती घ्यावी लागली. धनुष्यबाणाशिवायची शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. हा चिन्ह बदल शिवसेनेला राजकीयदृष्ट्या कितपत मानवतो याबाबत कमालीची उत्सुकता आहे