महाराष्ट्र

Assembly Election : मलकापुरात आघाडीचं ठरलं..! महायुतीचं ठरेना ! 

Buldhana : तिढा कायम; संभाव्य बंडखोरी टाळण्याचे धोरण

Malkapur constituency : बुलढाणा जिल्ह्यातील सात पैकी चार मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपाकडे आहेत. यामध्ये भाजपकडून जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मलकापूर मतदारसंघातील उमेदवार मात्र जाहीर करण्यात आला नसल्याने तेथील गुंता कायम असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी पक्षांतर्गत असलेला मोठा वाद निवडणुकीत मतदानरूपाने उमटणार असल्याने पक्षाकडून सावध पावले टाकल्या जात असून उम्मेदवारीच तिढा अजूनही कायम आहे.

जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातून आमदार श्वेता महाले, खामगाव विधानसभा मतदारसंघातून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मतदारसंघातून भाजपने डॉ.संजय कुटेंना उमेदवारी जाहीर केली आहे. कुटे 2024 पासून सलग चारवेळा निवडून आले आहे. फुंडकर यांनी दोनदा विजय मिळवला आहे. मागील लढतीत प्रथमच विजयी झालेल्या चिखलीच्या आमदार महाले दुसऱ्यांदा भाग्य आजमावणार आहे.

भाजपच्या वाट्यावर असलेल्या मलकापूर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. भाजपमध्ये असलेली गटबाजी, माजी आमदार चैनसुख संचेती विरुद्ध शिवचंद्र तायडे गटात बाजार समितीवरून झालेला संघर्ष, इच्छुकांची मोठी यादी, आदी कारणांमुळे येथील उमेदवाराची घोषणा पुढच्या यादीत करण्यात येईल, असे वृत्त आहे. तूर्तास दोन जागा नक्की असलेल्या शिंदे गटाची यादी उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाचे हे धोरण असल्याचे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले.

शिवसेना शिंदे गटाकडून बुलढाणामधून संजय गायकवाड आणि मेहकरमधून संजय रायमूलकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सिंदखेड राजाचे आमदार शरद पवार गटात गेल्याने ते आघाडीचे उमेदवार राहणार आहे. तिथे शिंदे गटाने दावा केला असून माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना संधी मिळते का, हे पाहणे मजेदार ठरणार आहे. कारण, अजित पवार या जागेसाठी आग्रही आहेत. ही एकमेव जागा ते सहजासहजी सोडणार नाही.

Buldhana : राजेंद्र शिंगणेंच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार सापडेना!

जिल्ह्यात सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार?

विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या बुलढाण्यात विधानसभेचे एकूण सात मतदारसंघ आहेत. या सात मतदारसंघांमध्ये मलकापूर, मेहकर, बुलढाणा, अमळनेर, चिखली, जळगाव जामोद आणि सिंदखेड राजा या मतदारसंघांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. तर उर्वरित दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी आमदार निवडून आला होता. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे बुलढाणा जिल्ह्यात यंदा विधानसभा निवडणुकीच्यावेळी रंगतदार चित्र पाहायला मिळणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!