Budget of Maharashtra : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे प्रसार माध्यमातून आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री अजित पवार यांनी एक अतिशय प्रगतीशील सर्वसमावेशक, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला. विशेषतः महिला शेतकरी युवा मागासवर्गीय अशा घटकांना समर्पित हा अर्थसंकल्प आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचा थापा असलेला आणि खोटा नेरेटिव्ह अर्थसंकल्प असा उल्लेख केला. परंतु यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले की, हा थापा मारणारा अर्थसंकल्प नाही. हा माय-बाबांसाठी असलेला अर्थसंकल्प आहे. कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा हा अर्थसंकल्प आहे. महिलांसाठी विविध योजना आणणारा, रोजगार देणारा, अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे.
ऐतिहासिक अर्थसंकल्प
अर्थसंकल्प झाल्यानंतर विरोधकांचे काही नेतेमंडळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजन वर बरोबर बघत होतो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते, आणि फक्त ते टीका करत होते. माझ्या मते हा अर्थसंकल्प एक नवीन इतिहास रचणारा अर्थसंकल्प आहे,
असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना आश्वासन दिले की, जे काही अर्थसंकल्पामध्ये आम्ही बोललो ते वेळेत आम्ही पूर्ण करू. अर्थसंकल्प निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही, तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. निश्चितपणे आम्ही दाखवून देऊ, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधकांवर निशाणा साधून फडणवीस म्हणाले की, बजेट होणार आहे हे समजून या बजेटवर काय विरोधकात बोलायचे अगोदरच लिहून येतात. अर्थसंकल्प कितीही चांगला केला असता, तरी या विरोधकांची प्रतिक्रिया टीका करणारीच असती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.