महाराष्ट्र

Akola BJP : ज्यांना हात धरून बाहेर काढलं, त्यांना पक्षानेही डावललं 

BJP Action : माजी राज्यमंत्र्याच्या पुतण्यासह सात निलंबित 

Defeat In Assembly Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोल्यामध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतरही केवळ चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे पानिपत झाले आहे. या पराभवाचा राग भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत काढला आहे. माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पुतण्या आशिष पवित्रकार यांच्यासह सात जणांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. 

निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये माजी महापौर अश्विनी हातवळणे यांचे पती प्रफुल हातवळणे यांचा देखील समावेश आहे. हातवळणे हे नितीन गडकरी यांच्या समर्थक आहेत. याशिवाय गडकरी यांचे दुसरे समर्थक तथा माजी नगरसेवक गिरीश गोखले यांनाही भाजपने काढले आहे. माजी महानगर अध्यक्ष उमेश गुजर, राजू टाकळकर, सौरभ शर्मा, हरिभाऊ काळे यांनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपच्या बैठकीतून अक्षरशः हात धरून बाहेर काढण्यात आलं होतं. हरिभाऊ काळे यांना देखील सिटी स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमातून हात धरून बाहेर काढण्यात आली होती. त्यानंतरही भारतीय जनता पार्टीने या सगळ्यांकडून प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आत्मपरीक्षण नाहीच

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव स्वतः मुळे झाला आहे. अकोला भाजपमध्ये आधीपासूनच दोन गट कार्यरत आहे. धोत्रे आणि पाटील अशीही गटबाजी सुरू होती. मात्र या गटबाजीकडे भाजपच्या प्रदेश पातळीवर कोणतेही उपाय करण्यात आले नाही. त्यानंतर ‘तुम्ही या ठिकाणी अपेक्षित नाही’, असे नमूद करीत भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद पद्धतीने बैठक आणि मेळाव्यांमधून बाहेर काढण्यात आले. माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी यांचा देखील असाच अपमान झाला होता.

Nana Patole : सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून

भाजपच्या काही नेत्यांकडून सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांना देखील अपमानाची वागणूक देण्यात आली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खुल्या शब्दही वापरण्यात आले. अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांना डिवचण्यात आले. ‘तुमचे लालाजी आता स्वर्गात गेले. तुमची सद्दी संपली. आता आम्ही म्हणू तीच भाजप’ अशी अपमानास्पद वागणूक भाजपचे अनेक कार्यकर्त्यांना देण्यात आली. या सगळ्या प्रकाराकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत भाजपने त्याच लोकांना पुढे केले ज्यांच्या विरुद्ध सर्वाधिक तक्रारी होत्या.

प्रामाणिकपणाचीच अपेक्षा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस आणि निधन झालेल्या आमदार गोवर्धन शर्मा यांच्याबद्दल सातत्याने अपशब्द काढणाऱ्यांबद्दल भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली चामडी भिजवावी, अशी भाजपची अपेक्षा होती. ‘ग्राउंड रियालिटी’ ठाऊक असतानाही का कोणास ठाऊक धृतराष्ट्राप्रमाणे भाजपने उमेदवाराची सौदेबाजी केली. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये भारतीय जनता पार्टीचा गड मातीमोल झाला. या सगळ्या पराभवाचे खापर आता सामान्य कार्यकर्त्यांवर फोडले जात आहे. भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी देखील याला मूकसंमती देत आहे. त्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते आता दुखावत चालले आहे.

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. घोडा मैदान दूर नाही. भारतीय जनता पार्टीला अकोला महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा असल्यास, कार्यकर्त्यांना दुखावून चालणार नाही. हे ठाऊक असताना सुद्धा अनेक कार्यकर्त्यांवर वस्तुस्थितीजन्य चौकशी न करता थेट कारवाई करण्यात आली आहे. यातील काही पदाधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली नाही. अकोल्यामध्ये भारतीय जनता पार्टीत सुरू झालेल्या गटबाजीचे बीज कोणी पेरले, हे शोधणे आता गरजेचे झाले आहे. असे झाले नाही तर ज्याप्रमाणे मोकळ्या मैदानांवर काँग्रेस गवत वाढलेले दिसते तशीच परिस्थिती अकोला जिल्ह्यामध्ये भाजपची झाल्याशिवाय राहणार नाही अशी दुःखद प्रतिक्रिया आता व्यक्त केली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!