प्रशासन

Buldhana : आक्षेपार्ह पोस्ट पोलिसांच्या रडारवर; व्हॉट्सॲप ग्रुपलाही इशारा

Social Media : अफवांचे प्रकार रोखण्यासाठी ग्रामीण पोलीस अलर्ट मोडवर

Assembly Election : विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया हे प्रचाराचे मुख्य साधन बनले आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियातील ग्रुपवरून प्रचार करावा, असे निर्देश आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र, उत्साही कार्यकर्ते नेत्याची इमेज उभी करण्याच्या आणि विरोधकाची इमेज खराब करण्याच्या नादात आक्षेपार्ह मजकूर आणि पोस्ट व्हायरल करीत असतात. अशा पोस्टवर आता पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. प्रसंगी वादग्रस्त मेसेजबद्दल संंबंधित ग्रुप अ‍ॅडमिनला पोलिसांची नोटीस बजावली जाऊ शकते. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांना फुकटचा प्रचार करताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्ये सदस्य असणा-या सायबर विभागाच्या मार्फत जिल्हयातील शेकडो अकाउंट्स दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्यापासून सोशल मीडिया अकाउंट्स तपासण्यात येत आहेत. प्रत्येक अकांऊटवर लक्ष असून नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी केले आहे.

समाज माध्यमे सर्वांच्याच हाती आहेत. पण त्याचा दुरुपयोग होता कामा नये. एखादी तथ्यहीन बातमी वा-यासारखी पसरविणाचे सामर्थ्य समाज माध्यमात आहे. त्यामुळे व्हॉट्सअप व तत्सम प्रसार माध्यमांचा वापर करताना आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, याचे भान असायला हवे.ग्रुप अॅडमिनने याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन शेगाव ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Akola West : ‘द लोकहित’ची बातमी खरी ठरली; साजिद यांनाच उमेदवारी

तर गंभीर गुन्हा

उमेदवारांना स्वतः च्या समाज माध्यमांची अधिकृत खाती (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम ब्लॉग,) निवडणूक आयोगाकडे नोंद करणे आवश्यक आहे. समाज माध्यमांवरुन अफवा पसरविणे, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे, भीतीदायक, दहशत निर्माण होणाऱ्या पोस्ट, परवानगी न घेता टाकलेल्या जाहिराती, याबाबत गंभीर गुन्ह्याची नोंद होवू शकते. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे ठाणेदार लिंगाडे म्हणाले. यासंदर्भात पोलिसांनी एक आदेश निर्गमित करून कारवाईचा इशारा दिला आहे.

वादग्रस्त मेसेज येणार अंगलट

एखाद्या सदस्याने जरी वादग्रस्त मेसेज केला, तर ग्रुप अॅडमिनवरही कारवाई होणार आहे. त्यामुळे अँडमिनने आजच सेटिंग बदलण्याची गरज आहे. प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियासह प्रत्येक हालचालीवर करडी नजर राहणार आहे. कोणत्याही ग्रुपवर किंवा इतर माध्यमातून वादग्रस्त पोस्ट किंवा वक्तव्य करू नये. अन्यथा अॅडमिनवरही कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!