प्रशासन

Shivshahi : ‘शिवशाही’ला भीषण अपघात, 12 जण दगावल्याची भीती

Gondia : भंडारा ते गोंदिया मार्गावर डव्वा परिसरातील घटना 

Terrible Accident : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना आज (29 नोव्हेंबर) दुपारी एक वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी ते डव्वा गावाजवळ. गोंदिया – कोहमारा राज्य महामार्गावर नाल्याजवळ घडली. घटनास्थळी नागरिक, पोलिस पोहोचले असून बचाव कार्य सुरु आहे.

गोंदिया जिल्ह्यातील खैरी गावाजवळ शिवशाही बस (MH 09 EM 1273) डव्वा परिसरात उलडून गंभीर अपघात झाला. घटनास्थळावर पोलिस व स्थानिक प्रशासनाने तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी अनेकांना बसच्या आतून बाहेर काढले.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार बसच्या अति वेगामुळे चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे ठिकाण अरुंद रस्त्यांमुळे आधीपासूनच धोकादायक मानले जाते. वाहतुकीचे नियम न पाळणे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे अशा अपघातांचे प्रमाण या मार्गावर वारंवार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

जखमींना तातडीने वैद्यकीय मदत आणि योग्य उपचार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येत आहे. जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर योग्य कारवाई केली जाणार आहे. पोलिस विभागाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी योजना आखण्यास सुरुवात केली आहे.

स्थानीय लोकांचा प्रतिसाद आणि सुरक्षा प्रश्न

घटनास्थळी उपस्थित स्थानिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेक जखमींचे प्राण वाचवण्यात यश आले. परंतु, या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांची सुधारणा, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, तसेच चालकांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी मदतकार्य सुरू ठेवले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Vijay Wadettiwar : ‘त्या’ कुबड्या आता फडणवीसांवर अवलंबून आहेत !

स्थानिक नागरिकांची मदत..

रस्त्यांची योग्य देखभाल आणि प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित वाहतूक सुविधा निर्माण करण्याची मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या दुर्घटनेने सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला आहे. प्रशासन आणि प्रवाशांनी योग्य दक्षता घेतल्यास अशा घटना टाळता येऊ शकतात. वाहतूक नियमांचे पालन करणे आणि वाहतुकीतील फाजील वेग रोखणे, हे उपाय भविष्यातील अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. मृत आणि जखमी प्रवाशांच्या ओळखींची प्रक्रिया सुरू असून त्यांचे कुटुंबीय मदतीसाठी प्रशासनाच्या संपर्कात आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!