महाराष्ट्र

Nagpur Central : राड्याबद्दल पोलिसांनी दिले मुख्य कारण 

BJP Vs Congress : कार्यकर्त्यांचा वाद पोहोचला शिगेला

Assembly Election : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी विपिन इटनकर यांनी आदेश दिले होते. परंतु या आदेशाच्या चिंधड्या काँग्रेस व भाजपने उडविल्या. जबाबदारी तर सर्वांचीच होती. मग ही जबाबदारी पक्षांनी का पार पाडली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये राडा का झाला, याचं कारण पोलिसांनी दिलं आहे. मध्य नागपुरातील या राड्याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी यांनी याबाबत माहिती दली.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी नागपुरात रोड शोसाठी पोहोचल्या. काँग्रेसने या रोड शोमध्ये शक्तीप्रदर्शन केले. रॅलीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसह, कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झालेत. रॅलीला व्यापक प्रतिसाद मिळाला. रॅलीमध्ये प्रियंका गांधी यांच्यासोबत आमदार विकास ठाकरेही होते. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनीही या रॅलीमध्ये जोर लावला. रॅली शक्ती प्रदर्शन करीत महाल भागात पोहोचली. महालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. बडकस चौकापासून काही अंतरावर संघ मुख्यालय आहे.

कार्यकर्त्यांमध्ये राडा

बडकस चौकात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यात चांगलीच बताबाची झाली. संघ मुख्यालयजवळ असल्याने पोलिसांनी या राड्यावर नियंत्रण मिळवले. प्रियंका गांधी यांना लगेच वाहनातून रवाना करण्यात आले. त्यावेळी सर्वांना वाटलं की वाद संपला. नागपुरात 20 नोव्हेंबरला मतदान झाले. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदान शांतते पार पडले. पोलिसांनाही राडा होईल, याची अपेक्षा नव्हती. पोलिसांनी त्याप्रमाणे नियोजन केले होते. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवरा बंटी शेळके यांनी भाजपवर आरोप सुरू केले. व्होटर स्लिप आणि पैसे वाटपाचा आरोप झाला. पोलिसांनी बंटी शेळके यांच्या बुथवर जाऊन पाकिटातील पैसे जमा केले. त्यामुळे बंटी शेळके आक्रमक झालेत. खोटा आरोप लावत कार्यकर्त्यांना फसविण्यात आल्याचं ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीच्या व्होटर स्लिप काही मतदान केंद्रामध्ये सापडल्यानंतर शेळके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही मतदान केंद्रांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हा वाद निवळल्यानंतर नागपूर शहर पोलिसांनी काही भागांमध्ये लोखंडी कठडे उभारत नाकाबंदी केली. नागपूर पोलिसांनी ज्या भागांमध्ये नाकाबंदी केली होती, त्या भागामध्ये बंटी शेळके काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह दाखल झालेत. पोलिसांनी नाकाबंदी करत एका विशिष्ट समाजातील मतदारांना अडवण्यास सुरुवात केल्याचा आरोप शेळके यांनी केला. वाद वाढल्याने पोलिस उपायुक्तसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. बंटी शेळके यांचा पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांसोबतही वाद झाला. अखेर बंटी शेळके यांनी पोलिसांना हे लोखंडी कठडे काढण्यास भाग पाडले.

वाहनांना अडविले

बंटी शेळके यांच्या बुथवर पैसे मिळाल्याचा आरोप. भाजपच्या व्होटर स्लिप काही मतदान केंद्रात सापडणे, यावरून वादाला सुरुवात झाली. मतदान आटोपल्यानंतर भाजपचे उमेदवार तथा आमदार प्रविण दटके हे महाल भागातून जात असताना त्यांच्या वाहनाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलं, असा आरोप झाला. काँग्रेसचे कार्यकर्ते दटके यांच्यासमोर आल्यानंतर मध्य नागपुरातील भाजपचे कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरले. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर राड्याला सुरुवात झाली. भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरू असताना आमदार प्रविण दटके यांनाही धक्काबुक्की झाली. हा सर्व प्रकार पाहता पोलिस घटनास्थळी दाखल झालेत.

मध्य नागपुरात मतदानानंतर गैरसमजातून राडा झाल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. बुथवरील अतिरिक्त ईव्हीएम मशिन नेणारी वाहनं अडचिण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. गाडीची तोडफोड करण्यात आली. परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हा हल्ला गैरसमजातून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मध्य नागपुरातील किल्ला परिसरात सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान ही घटना घडल्याचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले.

विजयानंतर काय?

मतदानाच्या दिवशी नागपुरात मोठा राडा झाला. निवडणुकीमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते समोरासमोर आलेत. पोलिसांनी त्याला गैरसमजुतीचे कारण दिले आहे. आता 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. निकालानंतर काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय असेल, या चिंता आता पोलिसांना आहे. त्यामुळं पोलिसांना या भागातील बंदोबस्त चोख ठेवावा लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!