महाराष्ट्र

Daryapur Constituency : युवा स्वाभिमानमुळे महायुतीमध्ये तणाव

Assembly Election : आमदार रमेश बुंदिले यांच्यासोबत न जाण्याचा भाजपला सल्ला

Dispute in Mahayuti : युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांच्यामुळे दर्यापूर मतदारसंघातील महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना सोबत घेत रवी राणा यांनी अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. रमेश बुंदिले हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यामुळे भाजपचे काही कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करीत आहेत. परिणामी महायुती मधील घटक पक्ष शिवसेना नाराज झाली आहे.

रमेश बुंदिले हे महायुतीचे उमेदवार नाहीत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार करू नये, अशी सूचना भाजपच्या कार्यकर्त्यांना आता देण्यात आली आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बुंदिले हे निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध प्रसंगी कारवाई केली जाईल असा इशारा देखील आता देण्यात आला आहे.

कारवाईचा बडगा 

भाजप आणि महायुतीच्या विरोधात जात उमेदवारी दाखल करणाऱ्या 40 जणांविरुद्ध भाजपने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात रमेश बुंदिले यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या घबराहट निर्माण झाली आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा यांना महायुतीने पाठिंबा दिला आहे. मात्र याच मतदारसंघातून तुषार भारतीय यांनी बंडखोरी केली. त्याचा परिणाम भारतीय यांना भोगाव लागला.

Yogi Adityanath : प्रखर हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर करणार प्रचार 

भाजपने तुषार भारतीय यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आमदार रवी राणा यांनी या संदर्भात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. गेल्या काही दिवसांपासून भाजप राणा दांपत्याच्या बरेच प्रेमात आहेत. राणा यांना प्रचंड विरोध असतानाही त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे अमरावतीची जागा महायुतीच्या हातून निसटली. अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे उमेदवारांनी विजय मिळवला. त्यानंतरही भाजपचा राणा प्रेम कमी झालं नाही.

महायुतीमधून विरोध असतानाही भाजपने रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघात पाठिंबा दिला. मात्र त्याच राणांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निवडणुकीत उतरवले. त्यामुळे तुषार भारतीय यांनी राणा यांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केली. ही प्रतिक्रिया आता तुषार भारतीय यांना महागात पडली आहे. असं असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना दर्यापूर मतदारसंघात बुंदिले यांचा प्रचार करू नये अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राणा यांना मदत करायची आहे की महायुतीला असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!