महाराष्ट्र

Amravati : मोदींची शपथविधी होताच.. अमरावतीत तणावाचे वातावरण

Modi 3.0 : काँग्रेस नेत्याचे फाडले पोस्टर

अमरावतीच्या मैदानात  यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे निवडणुकीच्या मैदानात होते. 4 जून च्या निकाला रोजी काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झाले. नवनीत राणा यांचा पराभव झाला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला बहुमत मिळाले आहे. 9 जुन रोजी नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक लगावत पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अशात काही समाजकंटकांनी काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडल्याने अमरावतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांच्यात काट्याची टक्कर होती. काँग्रेसचे उमेदवार विजयी होताच अमरावतीमध्ये राजकारण चांगलंच तापल. ज्या वाजा गाजत नवनीत राणा यांनी आपला प्रचार केला त्यांना डिवचण्यासाठी हे कृत्य तर नाही, अशी समजूत सध्या कार्यकर्त्यांची झाली आहे.

Sanjay Raut : दाऊदशी संबंधित प्रॉपर्टी क्लिअर केली; आणखी काय हवं?

काँग्रेस नेत्याचे फाडले पोस्टर

अमरावती मतदारसंघातून बळवंत वानखडे विजयी होताच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला डिवचण्यासाठी फार उधम केला. ज्यामुळे भाजपातील कार्यकर्ते फार संतप्त झाले होते. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान शपथविधीनंतर, अमरावतीत काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांचे पोस्टर्स फाडण्याचा प्रकार घडला आहे. राजकमल चौकात भाजपा आणि युवा स्वाभिमानी पक्ष  जल्लोषात मग्न होते. यावेळी महाविकास आघाडीचे खासदार बळवंत वानखेडे यांचं पोस्टर काही समाजकंटकांनी फाडले. त्यानंतर महायुतीचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आले. भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत. पोस्टर फाडण्यात आल्यानंतर अमरावतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेसचा संताप

26 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात एकूण 63.67 टक्के लोकांनी मतदान केले. अमरावती मतदारसंघातून एकूण 36 उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये होती. यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. यावर आता यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाला निशाणा साधत त्या म्हणाल्या की, मागासवर्गीय कार्यकर्ता खासदार झाल्यामुळे आणि तुमचा पराभव या गोष्टीची तुम्हाला खंत वाटत असल्यामुळे तुम्ही हे कृत्य केलेले आहे. जनता तुम्हाला सोडणार नाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.  शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी त्यांनी मागणी केली आहे

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!