ACB Action : जिल्ह्यातील महसूल विभागाला हादरवणारी मोठी घटना मंगळवारी (ता. 7) घडली. गोरेगावचे तहसीलदार किसन के.भदाणे यांच्यासह नायब तहसीलदार जी.आर.नागपुरे व एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले.
या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी तालुक्यातील गिधाडी गावातील फिर्यादीने तक्रार केली होती. त्यानुसार तहसीलदार भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार आहे. यात गोरेगावचे तहसीलदार किशन भदाणे, नायब तहसीलदार जी.आर. नागपुरे व एक खासगी व्यक्ती राजेंद्र गणवीर या तिघांवर 7,12,13,(1), (अ ) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.लांच लुचपत विभागाच्या या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
ACB Trap : बिअर शॉपीसाठी खास शुल्क वसूल करणाऱ्याची अशी उतरली नशा